Weekly Horoscope 10 To 16 November 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, नोव्हेंबर महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात अनेक मोठ मोठ्या ग्रहांची हालचाल पाहायला मिळेल. तसेच, नोव्हेंबरचा महिना देखील सुरु होणार आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष आणि वृषभ राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष राशीची लव्ह लाईफ (Aries Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - नवीन आठवड्यात तुमच्यातील रोमान्स हळुहळू वाढेल. बाहेरुन दिखावा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून प्रेम सिद्ध करा. तसेच, पार्टनरशी संवाद साधताना आधी ऐकण्याची सवय ठेवा.
करिअर (Career) - या आठवड्यात तुमच्या कामातून तुमच्यातील ऊर्जेचा अंदाज लावता येईल. काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येऊ शकतात. कामाच्या बाबतीत घाईगडबडीत घेतलेले निर्णय नंतर घातक ठरु शकतात.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास, पैशांची गुंतवणूक करताना सावधानता बाळगा. जर तुमच्या हाती नवीन प्रपोजल लागलं तर त्याची डेडलाईन आधी पडताळून घ्या.
आरोग्य (Health) - नवीन आठवड्यात तुमचा उत्साह चांगला राहील. शरीर संतुलित ठेवण्यासाठी जास्तीत जास्त फिजिकल एक्टिव्हीटी करा. छोट्या छोट्या गोष्टींमधून तुम्हाला समाधान मिळेल. नियमित योग आणि ध्यान करा.
वृषभ राशीची लव्ह लाईफ (Taurus Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या नात्यात सामंजस्य टिकून राहील. मात्र, आठवड्याच्या शेवटी नात्यात मतभेद निर्माण होऊ शकतात. अशा वेळी संयम राखणं गरजेचं आहे.
करिअर (Career) - कामाच्या ठिकाणी एखाद्या प्रोजेक्टचा तुम्ही हिस्सा व्हाल. तुमच्या ध्येयावर तुमचं लक्ष केंद्रित असेल. तसेच, पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगळी ठेवाल.
आर्थिक स्थिती (Wealth) - हा आठवडा पैशांचा वापर सावधानतेपूर्वक करा. कारण महिन्याचा मधला आठवडा आहे. त्यामुळे भावनेच्या भरात येऊन विनाकारण पैसे खर्च करु नका. तुम्ही प्रामाणिकपणे काम कराल पण त्याचा योग्य मोबदला तुम्हाला मिळेलच असं नाही.
आरोग्य (Wealth) - तुमची लाईफस्टाईल नॉर्मल असे. कोणत्याही गोष्टीचा तुम्ही बाऊ करणार नाही. मात्र, इतरांच्या वागण्याचा स्वत:च्या आरोग्याला त्रास करुन घेऊ नका. नियमित योग करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :