Weekly Horoscope 1 To 7 December 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, डिसेंबर (December) महिना लवकरच सुरु होणार आहे. वर्षाचा शेवटचा महिना असल्याने हा महिना फार खास असणार आहे. यासाठीच डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा सर्व राशींसाठी कसा असणार आहे. या आठवड्यात अनेक मोठ मोठ्या ग्रहांची हालचाल पाहायला मिळेल. त्यामुळे डिसेंबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष आणि वृषभ राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

Continues below advertisement

मेष राशीची लव्ह लाईफ (Aries Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - नवीन आठवड्यात तुमच्या नात्यात येणारे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. प्रेमात अनेक चढ-उतार येऊ शकतात. यासाठी पार्टनरबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवा. नात्याला सेकंड चान्स द्या. 

करिअर (Career) - मेष राशीच्या करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, कामाच्या ठिकाणी अनेक चढ-उतार येऊ शकतात. मात्र, त्या सर्व अडथळ्यांवर तुम्ही मात कराल. तुमच्यातील आत्मविश्वास खचू देऊ नका. जे लोक आयटी क्षेत्रात आहेत त्यांना बोनस मिळण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

आर्थिक स्थिती (Wealth) - हा आठवडा आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी लकी ठरणार आहे. तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली भरभराट झालेली तुम्हाला दिसेल. 

आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला जास्त सतर्क राहण्याची गरज आहे. याचं कारण म्हणजे पुरेशी झोप न मिळाल्यामुळे तुमच्यावर मानसिक तणाव जाणवू शकतो. 

वृषभ राशीची लव्ह लाईफ (Taurus Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - प्रेमसंबंधांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. तुमचा एक्स बॉयफ्रेंड तुम्हाला त्रास देऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागेल. 

करिअर (Career) - वृषभ राशीच्या लोकांना करिअरमध्ये अनेक अडचणी निर्माण होऊ शकतो. सहकाऱ्यांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. या संधीचा वेळीच लाभ घ्या.

आर्थिक स्थिती (Wealth) - तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल मात्र, आठवड्याच्या शेवटी तु्म्हाला पैशांची कमतरता भासू शकते. यासाठी पैशांचा जपून वापर करा. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल.

आरोग्य (Wealth) - तुमच्या आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे. लहा न मुलांना बदलत्या वातावरणाचा त्रास होऊ शकतो. यासाठी बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :     

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी डिसेंबरचा पहिला आठवडा कसा असणार? शिक्षण, पैसा, नोकरी, करिअर कसं असेल? साप्ताहिक राशीभविष्य