Weekly Horoscope 07 To 13 April 2025: एप्रिल महिन्याचा नवा आठवडा 07 ते 13 एप्रिल 2025 लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा 12 राशींसाठी फार महत्त्वाचा आहे. कारण या आठवड्यात सुद्धा मोठ्या ग्रहांचं संक्रमण सुरु आहे. एप्रिल महिन्याचा नवीन आठवडा मेष आणि वृषभ राशींसाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास साप्ताहिक राशीभविष्य (Aries Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - या आठवड्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रेम जीवनाशी संबंधित चिंता संपतील. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाण्याची आणि एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. अविवाहित लोकांसाठी लग्न होण्याची शक्यता आहे.
करिअर (Career) - मेष राशीच्या लोकांनो या आठवड्यात तुमचे लक्ष व्यावसायिक निर्णय, वित्त, कुटुंब आणि आर्थिक बाबींवर असेल. नवीन करार आणि भागीदारी सुरू करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. सरकारी नोकरी करणाऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लेखन आणि अभ्यासात चांगले निकाल मिळतील. परीक्षा आणि स्पर्धांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या करिअरच्या भविष्यासाठी नियोजन केल्याने तुम्हाला फायदा होईल.
आर्थिक स्थिती (Wealth) - या आठवड्यात तुम्हाला संयम राखण्याची आवश्यकता आहे. तुमच्या कौटुंबिक जीवनात तुम्हाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते
आरोग्य (Health) - या आठवड्यात तणावाचा सामान करावा लागू शकतो. अतिविचार टाळा, नियमित योग आणि ध्यान करा. तसेच, सकस आहार घ्या.
भाग्यवान दिवस - मंगळवार, गुरुवारशुभ तिथी- 6, 8भाग्यशाली रंग - गुलाबी, हलका पिवळा
वृषभ रास साप्ताहिक राशीभविष्य (Taurus Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - या आठवड्यात तुमच्या वैयक्तिक नात्यांमधील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. यावेळी संभाषण, पत्रव्यवहार, ई-मेल इत्यादींद्वारे तुमच्या भावनांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. भविष्यात प्रेमसंबंध विवाहबंधनात बदलू शकतात.
करिअर (Career) - हा आठवडा तुमच्यासाठी आव्हानांनी भरलेला असेल. तुमच्या करिअरमध्ये कठोर परिश्रम करूनही तुम्हाला कोणतेही विशेष फायदे मिळणार नाहीत. तुमच्या नोकरीत तुमचा बॉस तुमच्यावर असमाधानी असेल. सहकारी आणि वरिष्ठांकडून मिळणारा पाठिंबा मर्यादित राहील, तर व्यवसायात उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये अडथळे येऊ शकतात. भागीदार आणि पुरवठादारांबाबत सावधगिरी बाळगा. तरुणांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. बहुतेक वेळ अनावश्यक धावपळीत जाईल.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास, कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या लग्नाबाबत किंवा फ्लॅटसारख्या मालमत्तेच्या खरेदी-विक्रीबाबत निर्णय घेण्यापूर्वी खोलवर विचार करा. गेल्या आठवड्यापासून कुटुंबात वडिलोपार्जित मालमत्तेच्या वाटणीवरून निर्माण झालेला तणाव सोडवण्याची हीच योग्य वेळ आहे
आरोग्य (Health) - या आठवडयात आरोग्याबाबत छोट्या तक्रारी असू शकतात. तब्येतीची काळजी घ्याल. विश्रांती घ्या. सकस आहार ठेवा.
भाग्यवान दिवस - सोमवार, बुधवारशुभ तिथी- 7, 9भाग्यशाली रंग - पांढरा, पोपटी रंग
हेही वाचा>>
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींची लॉटरी लागणार? एप्रिलचा नवा आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य वाचा..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)