Weekly Horoscope 05 To 11 May 2025: मे महिन्याचा नवीन आठवडा लवकरच सुरु होत आहे. 5 ते 1 मे 2025 हा आठवडा अनेक अर्थांनी खास असणार आहे. कारण या आठवड्यात मोठ्या ग्रहांच्या हालचाली देखील होणार आहेत. मे महिन्याचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? कुंभ, मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

कुंभ रास साप्ताहिक राशीभविष्य (Aquarius Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) -  या आठवड्यात तुमचा मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. काही नवीन संबंध निर्माण होऊ शकतात.

करिअर (Career) - तंत्रज्ञान किंवा संशोधनाशी संबंधित लोक प्रगती करतील.

आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास थोडासा निष्काळजीपणा भविष्यात अडचणी निर्माण करू शकतो. या आठवड्यात तुम्हाला पैशांची बचत करण्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. 

आरोग्य (Health) - मज्जातंतूंमध्ये कमकुवतपणा किंवा ताण येऊ शकतो. ध्यान करणे फायदेशीर ठरेल.

भाग्यवान तारीख - 06,07,10भाग्यवान रंग - हिरवा, निळा, क्रीमभाग्यवान दिवस - बुधवार, शुक्रवार, शनिवारखबरदारी - जास्त कल्पनाशील होऊ नका, व्यावहारिक व्हा.उपाय - वाहत्या पाण्यात नारळ सोडावा आणि "ॐ नमो नारायणाय" मंत्राचा जप करा.

मीन रास साप्ताहिक राशीभविष्य (Pisces Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - नवीन आठवड्यात तुम्हाला एखादा जुना मित्र भेटू शकतो. वैवाहिक जीवनात शांती राहील.

करिअर (Career) - या आठवड्यात कला, शिक्षण किंवा सेवा क्षेत्राशी संबंधित लोकांना आदर मिळेल.

आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास, जर तुमचा कोणताही पैसा नुकसानभरपाई किंवा कर्जाच्या स्वरूपात बराच काळ अडकला असेल तर तो तुम्हाला या आठवड्यात मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक लाभाचे शुभ संकेत देत आहे. 

आरोग्य (Health) - या आठवड्यात पोट किंवा अ‍ॅलर्जीची समस्या असू शकते. तुमचा आहार नियंत्रणात ठेवा.

भाग्यवान तारखा - 04,05,09भाग्यशाली रंग - गुलाबी, पिवळा, लालभाग्यवान दिवस - सोमवार, मंगळवार, गुरुवारखबरदारी - भावनांच्या भरात निर्णय घेऊ नका.उपाय - भगवान विष्णूची पूजा करा आणि गरजूंना मिठाई वाटा.

हेही वाचा :

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी 'मे'चा नवा आठवडा भाग्याचा!शुभ योगांनी नशीब चमकणार, साप्ताहिक राशीभविष्य वाचा 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)