Wedding Dates on January 2025 : नवीन वर्षाची सुरुवात व्हायला अवघा एकच महिला शिल्लक आहे. सध्या विवाहाचे (Wedding) मुहूर्त सुरु आहेत. हिंदू धर्मानुसार, खरमासाच्या दरम्यान लग्न, मुंज, गृह प्रवेश यांसारखे शुभ कार्य टाळावे. या महिन्याची सुरुवात डिसेंबरच्या मध्यापासून सुरू होते आणि जानेवारीच्या मध्यापर्यंत चालते.त्यामुळेच या काळात लोक कोणत्याच मंगलमय कार्याची सुरुवात करत नाहीत.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 15 डिसेंबर रोजी सूर्य धनु राशीत संक्रमण करणार आहे. खरमासाचा काळ हा एक महिन्यांचा असणार आहे. तर, 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी हा काळ संपेल. त्यानंतर विवाहाचे शुभ मुहूर्त पुन्हा सुरु होतील.
जानेवारीत विवाहाचे 'हे' 10 शुभ मुहूर्त
16 जानेवारी - या दिवशी विवाहाचा शुभ मुहूर्त आहे. त्याचबरोबर, तृतीया तिथी आणि मघा नक्षत्र आहे.
17 जानेवारी - या दिवशी चतुर्थी तिथी तसेच, मघा नक्षत्र आहे. हा मुहूर्त विवाहासाठी शुभ आहे.
20 जानेवारी - या दिवशी षष्ठी तिथी आणि हस्त नक्षत्र आहे. तसेच, विवाहाचा शुभ मुहूर्त आहे.
21 जानेवारी - या दिवशी अष्टमी तिथी आणि रेवती नक्षत्र आहे.
22 जानेवारी - या दिवशी सुद्धा अष्टमी तिथी आणि रेवती नक्षत्र असणार आहे.
23 जानेवारी - या दिवशी दशमी तिथी आणि अनुराधा नक्षत्राचा प्रभाव असणार आहे.
24 जानेवारी - या दिवशी दशमी तिथी तसेच अनुराधा नक्षत्राचा प्रभाव असणार आहे.
26 जानेवारी - या दिवशी द्वादशी तिथी तसेच मूल नक्षत्राचा शुभ योग आहे.
27 जानेवारी - या दिवशी त्रयोदशी तिथी तसेच मूल नक्षत्र आहे. त्याचबरोबर विवाहाचा शुभ मुहूर्त आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: