Vish Yog 2026 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, 9 ऑक्टोबर 2026 रोजी म्हणजेच आज चंद्राने राशी परिवर्तन केलं आहे. पंचांगानुसार, या दिवशी चंद्र सकाळी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी शनिदेव मीन राशीत आधीपासूनच विराजमान आहे. त्यामुळे कन्या आणि मीन रास एकमेकांच्या सातव्या स्थानी असणार आहेत. त्यामुळेच चंद्र आणि शनिच्या दरम्यान समसप्तक योग (Samsaptak Yog)निर्माण होणार आहे. त्याचबरोबर, दोन्ही ग्रह एकमेकांच्या सप्तम दृष्टीवर असल्यामुळे विष योग निर्माण होणार आहे.
मेष रास (Aries Horoscope)
विष योग मेष राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक ठरु शकतो. या काळात तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागणार आहे. तसेच, आरोग्याशी संबंधित तुम्हाला अनेक तक्रारी जाणवू शकतात. तसेच, विनाकारण तुमचे वाद वाढू शकतात. यासाठी आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. मानसिक शांतीसाठी आणि नकारात्मक प्रभाव दूर करण्यासाठी तुम्ही हनुमान चालीसाचं पठण करु शकता.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांच्या खर्चात अचानक वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्हाला गरज असेल तरच पैसे खर्च करा. रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांबरोबर विनाकारण वाद घालू नका. तुमचे मतभेद होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या विरोधकांपासून सावध राहण्याचा प्रयत्न करा. शनिचा आणि चंद्राचा प्रभाव तुमच्यावर भारी पडू शकतो.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी विष योगाचा काळ हा आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुम्हाला सतर्कता बाळगण्याची गरज आहे. तसेच, कामाच्या बाबतीत सावध राहा. व्यवसायाशी संबंधित निर्णय घेताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचं मत विचारात घ्या. जर तुमचा नोकरी बदलीचा विचार असेल तर हा काळ तुमच्यासाठी आव्हानात्मक असू शकतो. तसेच, या कालावधीत पैशांची कुठेही गुंतवणूक करु नका. तुमचं नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर महत्त्वाच्या बातम्या :
