Vish Yog 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, नुकतंच मीन राशीत चंद्राचं संक्रमण झालं आहे. यामुळे या राशीत आधीपासूनच उपस्थित असलेल्या शनिसह (Shani Dev) युती होणार आहे. यामुळे विष योग (Yog) निर्माण होणार आहे. हा योग काही राशींसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. त्यामुळे विष योगामुळे कोणकोणत्या राशींचा कठीण काळ सुरु होणार आहे ते जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

विष योगाचा काळ अडीच दिवसांपर्यंत असतो. त्यामुळे या अडीच दिवसांचा काळ कोणत्या राशींसाठी आव्हानात्मक ठरणार आहे ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी ही युती द्वादश चरणात असणार आहे. याच कारणामुळे तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी घडल्याने तुमची सतत चिडचिड होऊ शकते. तुम्हाला मानसिक ताण जाणवू शकतो. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमचं नुकसान देखील होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्चात वाढ होऊ शकते. त्यामुळे व्यवहार करताना सांभाळून करा. 

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी चंद्र आणि शनिची युती दहाव्या स्थानी आहे. या कालावधीत तुम्हाला करिअरशी संबंधित अनेक अडचणी उद्भवू शकतात. तसेच, कामाच्या ठिकाणी दबावाचं वातावरण राहील. वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर तुमचे मतभेद असतील. कामाचा ताण वाढू शकतो. मात्र, तुम्हाला तुमच्या अपेक्षेनुसार परिणाम मिळणार नाहीत. या काळात भगवान विष्णूचं स्मरण तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या भाग्याच्या स्थानी हा योग निर्माण होणार आहे. त्यामुळे तुम्हाला नशिबाची साथ मिळणार नाही. तसेच, तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे उशिराने होणार आहेत. नवीन योजनांचा तुम्हाला लाभ घेता येणार नाहीत. मनात सतत नकारात्मक विचार येतील. अशा वेळी सकाळच्या दरम्यान सूर्याला जल अर्पण केल्यास तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या सहाव्या चरणात हा योग निर्माण होणार आहे. या काळात तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवतील. त्यामुळे वेळीच काळजी घेण्याची गरज आहे. या काळात तुम्हाला मानसिक तणाव, थकवा अधिक जाणवू शकतो. कामाच्या ठिकाणी स्पर्धात्मक वातावरण राहील. अशा वेळी तुमची लाईस्टाईल संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करा. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीत चंद्र आणि शनिची युती होणार आहे. या काळात निर्माण झालेल्या विष योगाच्या प्रभावाने तुम्हाला अधिक धोका जाणवू शकतो. तुमच्या आत्मविश्वासात कमतरता दिसून येईल. तसेच, तुमच्या नात्यात देखील दुरावा निर्माण होऊ शकतो. या काळात कोणताही निर्णय घेताना दहा वेळा विचार करा. 

हे ही वाचा : 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Shani Ast 2026 : सावधान! मार्चमध्ये 4 राशींचे 40 दिवस धोक्याचे; शनीच्या अस्तामुळे कठीण काळ सुरु...