Vish Yog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक अंतराने संक्रमण करतात. यामुळे अनेक शुभ-अशुभ योग निर्माण होतात. याचा प्रभाव मानवासह देश-विदेशात होतो. ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनी (Shani Dev) सध्या मीन राशीत विराजमान आहे तर चंद्र (Moon) देव 18 जुलै 2025 रोजी मीन राशीत संक्रमण करणार आहे. यामुळे कुंभ राशीत चंद्र आणि शनीची युती होणार आहे. या युतीमुळे विष योग निर्माण होणार आहे. याचा कोणत्या राशींवर कसा परिणाम होणार हे जाणून घेऊयात.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी विष योग फार धोकादायक ठरणार आहे. याचा प्रभाव तुमच्या लग्न कार्यावर देखील होऊ शकतो. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांनी या काळात जपून काम करावे. ज्युनिअर सिनिअर असा भेदभाव करु नये. तसेच, या काळात कोणालाही पैसे उधारी देऊ नका. तुम्हाला धनहानी होऊ शकते. आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी विष योग फार नुकसानकारक ठरणार आहे. या राशीच्या बाराव्या चरणात हा योग निर्माण होतोय. त्यामुळे या काळात तुमच्याकडून विनाकारण पैसे खर्च होतील. नशिबाची साथ तुमच्याबरोबर नसणार. तसेच, पार्टनरशिपमध्ये देखील काम करताना नुकसान होईल. कामाच्या ठिकाणी बॉस नाराज होऊ शकतात.
मकर रास (Capricorn Horoscope)
विष योगाचा मकर राशीवर देखील परिणाम होणार आहे. या राशीच्या तिसऱ्या चरणात हा योग निर्माण होणार आहे. त्यामुळे तुमचे भावा-बहिणीबरोबर मतभेद होऊ शकतात. विनाकारण प्रवास करावा लागू शको. तसेच, कोणत्याही कारणावरुन तुमची चिडचिड होऊ शकते. या काळात तुमचा दिर्घकालीन आजार देखील पुन्हा उद्भवू शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :