Vinayak Chaturthi 2026 : प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणारी चतुर्थी ही विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi)म्हणून साजरी केली जाते. या दिवशी विद्येची देवता, बुद्धीदाता आणि विघ्नहर्ता श्री गणेशाची मनोभावे पूजा करण्याची पूर्वापार परंपरा आहे. या निमित्ताने लाडक्या गणरायाच्या कोणत्या प्रिय राशी आहेत हे जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ ग्रह आहे. या राशीच्या लोकांवर नेहमी बाप्पाची कृपा असते. तसेच, या राशीच्या लोकांना नेहमी मेहनतीचं फळ मिळते. त्याचबरोबर या राशीच्या लोकांना कधीच पैशांची कमतरता भासत नाही. त्यामुळे या राशीचे लोक सदैव ऐशोआरामात जगतात. यांच्या संख-समृद्धीत नेहमी भरभराट झालेली दिसते. तसेच, करिअरमध्ये तुमच्या प्रगतीची चिन्हे आढळतात. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. या ग्रहाचा अधिपती गणपतीला मानतात. गणपती हा बुद्धी आणि विवेकाचा देवता मानतात. त्यामुळे या राशीच्या लोकांवर गणपतीची विशेष कृपा असते. या राशीच्या लोकांचे प्रगतीचे अनेक संकेत दिसतात. कामात चांगली प्रगती होते. तसेच, चतुर्थीच्या काळात तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करता येतील. आर्थिक क्षेत्रात तुमची प्रगती दिसून येईल. 

Continues below advertisement

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. ही रास देखील गणपतीची आवडती रास आहे. या राशीच्या लोकांना कधीच आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही. तसेच, यांना प्रत्येक कामात यश मिळतं. यांच्या मनातील इच्छा पूर्ण होतात. तसेच, शिक्षण क्षेत्रात या राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळतो. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांवर नेहमी बाप्पाचा विशेष आशीर्वाद असतो. या राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. या राशीच्या लोकांचा स्वभाव थोडा आक्रमक स्वरुपाचा असतो. अशा वेळी रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी गणपती विशेष मदत करतात. गणपतीच्या आशीर्वादाने तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतात. 

विनायक चतुर्थी शुभ मुहूर्त 2026 (Vinayak Chaturthi Shubh Muhurta 2026)

यंदा फेब्रुवारी 2026 महिन्यात फाल्गुन मासाच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला धार्मिक महत्त्व  आहे.  पंचांगानुसार, फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीची सुरुवात 20 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजून 38 मिनिटांनी होणार आहे. ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजता समाप्त होईल. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11 वाजून 42 मिनिटांनी सुरु होईल आणि दुपारी 1 वाजता संपेल. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा कसा असणार? कोणत्या राशी होणार मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य