Vinayak Chaturthi 2024 : हिंदू पंचांगानुसार, आज म्हणजेच 04 डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दिवशी विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi) आहे. मात्र, काही प्रदेशात 13.10 मिनिटांनी मध्यान्ह समाप्ती होत असल्याने अशा सर्व दुसऱ्या दिवशी म्हणजेच 05 डिसेंबर रोजी विनायक चतुर्थीचा व्रत असेल. हिंदू धर्मात बाप्पाला पूजनीय मानले जाते. गणपतीला संकष्ट चतुर्थी आणि विनायक चतुर्थी अशा चतुर्थी समर्पित आहेत. त्यामुळे या दिवसाचं महत्त्व फार आहे. 


विनाक चतुर्थीच्या दिवशी लाडक्या बाप्पाची आराधना केली जाते. त्याच्यासाठी खास उपवास ठेवला जातो. आणि मनोभावे पूजा केली जाते. तसेच, या दिवशी बाप्पाची मनोभावे पूजा केल्याने शुभ फळ मिळते. बाप्पा भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतो अशी मानय्त आहे त्यामुळे या दिवसाचं महत्त्व फार आहे. त्यामुळे या मार्गशीर्ष महिन्याच्या विनायक चतुर्थीला नेमके कोणते शुभ योग जुळून आले आहेत हे जाणून घेऊयात. 


मार्गशीर्ष विनायक चतुर्थी


पंचांगानुसार यंदा मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी 4 डिसेंबरला दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी सुरु होईल. तर 5 डिसेंबरला दुपारी 12 वाजून 49 मिनिटांनी संपेल. उदयतिथीनुसार गुरुवारी 5 डिसेंबरला विनायक चतुर्थीचे व्रत केले जाणार आहे.              


मार्गशीर्ष विनायक चतुर्थीचा शुभ मुहूर्त


मार्गशीर्ष विनायक चतुर्थीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11 वाजून 9 ते दुपारी 12 वाजून 49 मिनिटांपर्यंत असेल. या दिवशी श्रीगणेशाची पूजा करण्यासाठी 1 तास 40 मिनिटांचा शुभ मुहूर्त मिळेल. या दिवशी ब्रह्म मुहूर्त सकाळी 5 वाजून 11 मिनिटांपासून ते 6 वाजून 5 मिनिटांपर्यंत असेल. या दिवशी शुभ मुहूर्त किंवा अभिजीत मुहूर्त सकाळी 11 वाजून 51 मिनिटांपासून ते 12 वाजून 33 मिनिटांपर्यंत असेल.


मार्गशीर्ष विनायक चतुर्थी शुभ योग


विनायक चतुर्थीला रवियोग जुळून आल्यामुळे हा मुहूर्त सकाळी 7 वाजून ते सायंकाळी 5 वाजून 26 मिनिटांपर्यंत असणार आहे. यावेळी तुमच्या जीवनातील सर्व दोष दूर होतील. तसेच, विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी वृद्धी योग तयार होतोय. हा योग दुपारी 12 वाजून 28 मिनिटांपर्यंत असणार आहे.                        


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Horoscope Today 04 December 2024 : आज विनायक चतुर्थीचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य