Venus Transit: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात कुठला ना कुठला ग्रह आपली स्थिती बदलत असतो.ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र ग्रहाला प्रचंड महत्त्व आहे. या ग्रहाच्या कृपेमुळे व्यक्तीला आयुष्यामध्ये सुखसमृद्धी ऐश्वर्य प्राप्त होते. हे. शुक्र हा सौंदर्य, आनंद, वाहन, संपत्ती, कला आणि व्यावसायिक संबंधाचा कारक आहे . शुक्र ग्रह जेव्हा जेव्हा संक्रमण करतो तेव्हा सर्व राशींवर त्याचा परिणाम होतो. 12 फेब्रुवारीला शुक्र राशीने मकर राशीत प्रवेश केला असून तिथे तो ६ मार्चपर्यंत असणार आहे. शुक्र हा सौंदर्य, आनंद, वाहन, संपत्ती, कला आणि व्यावसायिक संबंधाचा कारक आहे. शुक्राच्या शुभ प्रभावामुळे माणसाला सर्व प्रकारच्या सुखात वाढ होते. तर शुक्राचे भ्रमण हे काही राशींवर परिणाम करणारे आहे. जाणून घेऊया शुक्र मकर राशीत प्रवेश झाल्याने कोणत्या राशींना फटका बसण्याची शक्यता आहे.
मिथुन (Gemini )
मकर राशीतील शुक्राचे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी अनेक प्रकारच्या समस्या घेऊन आले आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये काही आव्हाने आणि अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या कामात काही अडथळे येऊ शकतात. या काळात तुमचा कामाचा ताण वाढेल ज्यामुळे तुम्हाला मानसिक दडपण जाणवेल. या संक्रमणादरम्यान, तुमच्या जीवनात अशा समस्या उद्भवू शकतात ज्यावर मात करणे तुम्हाला कठीण वाटेल. व्यापार क्षेत्रात तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. यावेळी तुमची आर्थिक स्थितीही बिघडू शकते. तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध बिघडू शकतात.
कर्क (Cancer)
कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण हे शुभ फळ देणारे नाही भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नुकसान सहन करावे लागू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक प्रकारच्या अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. व्यावसायिकांनी कोणताही व्यवहार करताना अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. नोकरदारांना आज कामाच्या ठिकाणी समाधान मिळणार नाही. तुम्हाला कोणतेही काम करावेसे वाटणार नाही. यावेळी तुम्ही तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यावर भर द्यावा. तुम्ही कुठेतरी सहलीला जात असाल तर या काळात काळजी घ्या. आरोग्याशी संबंधित समस्याही उद्भवू शकतात.
वृश्चिक(Scorpio)
शुक्राचे संक्रमण वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात मोठी उलथापालथ आणणार आहे. या काळात तुम्ही आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहाल. कामाचा ताण वाढणार आहे.तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. व्यवसायात मोठी गोष्ट तुमच्या हातून निसटू शकते. तुमचे खर्च आवश्यकतेपेक्षा जास्त वाढू शकतात. तुम्हाला तुमच्या बजेटचे काळजीपूर्वक नियोजन करावे लागेल. समजूतदारपणा नसल्यामुळे नात्यात चढ-उतार येऊ शकतात. जोडीदाराशी दुरावा वाढू शकतो. मानसिक तणाव वाढू शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)