Venus Transit 2023 : शुक्र ग्रह हा ऊर्जा, सौंदर्य आणि प्रेमाचा कारक मानला जातो. बलवान शुक्र माणसाच्या जीवनात समाधान, उत्तम आरोग्य आणि तीक्ष्ण बुद्धिमत्ता देतो. शुक्रवारी 3 नोव्हेंबर रोजी पहाटे 04:58 वाजता शुक्राने कन्या राशीत प्रवेश केला आहे. शुक्राचे हे संक्रमण अनेक राशींसाठी खूप महत्वाचे असणार आहे. काही राशीच्या लोकांना शुक्राच्या या संक्रमणामुळे खूप फायदा होणार आहे. चला जाणून घेऊया या भाग्यशाली राशींबद्दल.
शुक्र हा सुख, वैभव, समृद्धी आणि सौंदर्याचा कारक
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा त्याचा सर्व राशींच्या लोकांवर शुभ आणि अशुभ दोन्ही प्रभाव नक्कीच पडतो. वैदिक ज्योतिषात शुक्र हा सुख, वैभव, समृद्धी, विलास आणि सौंदर्याचा कारक ग्रह मानला जातो. शुक्राला एका राशीतून दुस-या राशीत जाण्यासाठी सुमारे एक महिना लागतो.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी शुक्राचे हे संक्रमण खूप शुभ असणार आहे. तुम्हाला करिअर, पैसा आणि नातेसंबंधात विशेष लाभ मिळतील. अध्यात्मिक कार्याकडे तुमचा कल असू शकतो. हे संक्रमण तुमच्यासाठी फलदायी ठरेल. करिअरच्या क्षेत्रात तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. या राशीच्या लोकांना नोकरीच्या नवीन संधी मिळतील. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. व्यवसायाच्या क्षेत्रात नवीन संपर्क प्रस्थापित कराल. बचत करण्यात यश मिळेल.
कर्क
शुक्राचे हे संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी चांगले परिणाम घेऊन येत आहे. शुक्राची ही स्थिती तुमच्या जीवनात प्रगती आणि शुभ आणेल. तुम्ही करत असलेले सर्व प्रयत्न यशस्वी होतील. कन्या राशीतील शुक्राचे संक्रमण तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. या काळात तुम्हाला जास्त प्रवास करावा लागू शकतो. तुमच्या करिअरच्या संदर्भात तुम्हाला स्थान बदलाचाही सामना करावा लागू शकतो. यावेळी तुमचा मान-सन्मान वाढेल. नोकरीत समाधान मिळेल. व्यवसायातही तुम्हाला फायदा होईल.
कन्या
शुक्राचे हे संक्रमण फक्त कन्या राशीत झाले आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांनाच याचा अधिकाधिक फायदा होणार आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कन्या राशीतील शुक्राचे संक्रमण तुमच्यासाठी नोकरीच्या नवीन संधी घेऊन आले आहे. तुमची उद्दिष्टे साध्य करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कामानिमित्त परदेश दौऱ्यावर जाण्याचीही शक्यता आहे. तुमचा मान-सन्मान वाढेल. या राशीचे लोक नोकरीत उत्तम कामगिरी करतील. तुमच्या पगारातही वाढ होण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani Margi 2023 : आज शनि होणार मार्गी, या राशींची होणार प्रगती, लाभ मिळतील, जाणून घ्या