Vastu Tips : नवीन वर्षाची सुरुवात प्रत्येकाला खूप उत्साहाने करायची असते. त्यासाठी आपण आपले घर देखील सजवतो. परंतु, वास्तू शास्त्रात घरातील काही वस्तूंबद्दल सांगण्यात आलंय. वास्तूशास्त्रात सांगितलेल्या गोष्टींचा अवलंब केला तर तुम्ही तुमच्या घरात सुख-समृद्धी आणू शकता. तुम्हालाही 2023 वर्षाची सुरुवात अतिशय भव्य पद्धतीने करायची असेल तर वास्तुशास्त्रातील उपाय अवश्य करून पाहा. घरातील एखादी वस्तू खराब असेल तर घरात अनेक समस्या निर्माण होतात. वाईट वास्तूमुळे आर्थिक समस्या निर्माण होतात. घरातील सुखासाठी वर्षाच्या सुरुवातीला काही गोष्टी घरातून काढून टाका. असे केल्याने वर्षभर घरात सुख-शांती नांदते.
बरेच लोक प्रेमाचे प्रतीक म्हणून ताजमहालचा फोटो किंवा शो पीस घरात लावतात. परंतु, ताजमहालचा फोटो घरात लावणे अशुभ मानले जाते. वास्तूनुसार ज्या घरात ताजमहालचा फोटो ठेवला जातो, त्या घरात नकारात्मक उर्जेचा संचार होतो. तुमच्या घरात ताजमहालचा फोटो असेल तर नवीन वर्षाच्या आधी काढून टाका.
घरामध्ये असे कोणतेही चित्र लावू नये की ज्यामध्ये युद्ध आणि हिंसा दिसत असेल. यामुळे घरामध्ये महाभारताचे चित्र लावणे अशुभ मानले जाते. ज्या घरात महाभारताचे चित्र असते, त्या घरातील सदस्यांमध्ये दुरावा कायम असतो. नवीन वर्षाच्या आगमनापूर्वी घरातून अशी चित्रे काढून टाका.
घरामध्ये अशी चित्रे लावणे टाळावे ज्यामध्ये एखादी वस्तू बुडताना दिसते. उदाहरणार्थ, मावळतीचा सूर्य, बुडणारी बोट किंवा जहाज. अशा चित्रांमुळे घरातील सदस्यांच्या मनात दुःख निर्माण होते आणि घरातून सकारात्मक ऊर्जा निघून जाते.
वन्य प्राण्यांचे फोटो लावणे टाळा. अशी चित्रे घरात हिंसाचार वाढवण्याचे काम करतात. ज्या घरात अशी चित्रे असतात, त्या घरात नेहमी अशांती आणि कलह राहतो. या घरातील सदस्यांचे वर्तनही हिंसक होते. तुमच्या घरात असे चित्र असेल तर नवीन वर्षापूर्वी काढून टाका.
वास्तूनुसार धबधब्याच्या चित्राचा घराच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होतो. वाहत्या पाण्याप्रमाणे पैसाही घराबाहेर जाऊ लागतो आणि घरात उधळपट्टी वाढते असे म्हणतात. तुमच्या घरातील नवीन वर्षाच्या आगमनापूर्वी धबधब्याचे चित्र घरातून काढून टाका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
संबंधित बातम्या