Vastu Plant For Home: वास्तुशास्त्रात (Vastu Shashtra) अशाच काही वनस्पतींबद्दल सांगण्यात आले आहे, त्यांना घरात लावल्याने दुर्दैव आणि दारिद्र्य येते. अनेक वेळा लोक नकळत ही झाडे लावतात, जी नंतर विनाशाचे कारण बनतात. (Vastu Tips)
वास्तुशास्त्रात झाडे आणि वनस्पतींचे विशेष महत्त्व
वास्तुशास्त्रात झाडे आणि वनस्पतींचे विशेष महत्त्व सांगितले आहे. काही झाडे घरात समृद्धी आणतात तर काही झाडे घरात दु:ख आणि दारिद्र्य आणण्याचे काम करतात. अशी झाडे घरात कधीच लावू नयेत.
'अशी' झाडे घरात कधीच लावू नयेत
मेहंदीचे रोप
वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की, मेहंदीच्या रोपामध्ये वाईट शक्तींचा वास असतो. ही वनस्पती घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जा पसरते. यामुळे घरातील सुख-शांती भंग होऊ शकते.
चिंचेचे झाड
वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की, चिंचेचे झाड घरात नकारात्मकता आणते. हे लावल्याने घरात नेहमी भीतीचे वातावरण असते. म्हणूनच ते घरात लावू नये.
खजुराचे झाड
घराच्या अंगणात चुकूनही खजुराचे झाड लावू नये. हे अत्यंत अशुभ मानले जाते. हे झाड दिसायला खूप सुंदर आहे पण ते लावल्याने कुटुंबातील सदस्यांचे कर्ज वाढते. असे वास्तुशास्त्रात लिहलंय.
सुकलेली झाडे
वास्तुशास्त्रात म्हटलंय की, घरात लावलेली कोणतीही झाडे सुकत असतील तर ती काढून टाकणे चांगले. वास्तूनुसार, सुकलेली झाडे आणि झाडे घरात दुःख आणण्याचे काम करतात. त्यांच्यामुळे नकारात्मकता वाढते.
बाभळीचे रोप
वास्तुशास्त्रानुसार, घरात आणि आजूबाजूला काटेरी झाडे कधीही लावू नयेत. त्यामुळे घरात तणावाचे वातावरण निर्माण होते. अशी झाडे परस्पर मतभेद वाढवण्याचेही काम करतात. शास्त्रानुसार घरात बाभळीचे रोप लावल्याने वाद वाढतात. त्यामुळे कुटुंबीय मानसिक आजारी होतात. तसेच ही झाडे घराभोवती ठेवणे अशुभ मानले जाते.
घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा
वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते. वास्तूनुसार, जी वस्तू कोणत्याही दिशेला ठेवली जाते, त्याचा प्रभाव कुटुंबातील सदस्यांवर पडतो. वास्तूमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी एक विशिष्ट दिशा निश्चित केलेली आहे. वास्तूचे हे नियम पाळले नाहीत तर घरातील सदस्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या
Power Of Silence : व्यर्थ बोलणे हेच माणसाच्या सर्व दु:खाचे कारण! गप्प राहण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या