Vastu Tips : हिंदू धर्मात उपासनेचे अनेक नियम आहेत. त्याच बरोबर वास्तुशास्त्रात पूजेच्या ठिकाणापासून पूजास्थानापर्यंतचे नियम आणि दिशा सांगितली आहे. या नियमांचे पालन केल्याने पूजा सफल होते आणि घरात सुख-समृद्धी येते. वास्तुशास्त्रात पूजा गृहाबाबत काही महत्त्वाचे नियम सांगण्यात आले आहेत. यापैकी एक म्हणजे देवघरात माचिसची पेटी ठेवल्याने दोष निर्माण होतात. जाणून घ्या पूजागृहात माचिसच्या काड्या का ठेवू नयेत?


देवघरात माचिसची पेटी ठेवल्याने दोष निर्माण होतात


प्रत्येक घरात देवी-देवतांच्या पूजेसाठी विशेष स्थान, पूजा कक्ष किंवा मंदिर बनवले जाते. हे घरातील सर्वात पवित्र स्थान आहे. पूजा कक्षात देवी-देवतांची नियमित पूजाही केली जाते. त्यामुळे या पवित्र ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दोष नसणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. वास्तुशास्त्रानुसार पूजास्थानातील दोषांमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.


पूजेमध्ये माचिसची पेटी का ठेवू नये?



पुजेशी संबंधित अनेक साहित्य आपण पूजा कक्षात ठेवतो. यापैकी एक म्हणजे माचिसची पेटी, ज्याचा उपयोग दिवे किंवा अगरबत्ती पेटवण्यासाठी केला जातो. पण वास्तुशास्त्रानुसार पूजेच्या खोलीत माचिसची पेटी ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते.



पूजेच्या खोलीत माचिसची पेटी ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. पूजा कक्ष हे पवित्र स्थान आहे, त्यामुळे या पवित्र ठिकाणी ज्वलनशील पदार्थ ठेवणे अशुभ मानले जाते.



माचिसच्या काड्यांबरोबरच लाइटर इत्यादी ज्वलनशील पदार्थही पूजा कक्षात ठेवू नयेत. जर तुम्हाला पूजेचे शुभ परिणाम मिळवायचे असतील तर मंदिरात या वस्तू ठेवू नका. धूप दिवा लावल्यानंतर तुम्ही तो इतर ठिकाणी ठेवू शकता.



वास्तुशास्त्रानुसार माचिसच्या काड्या मंदिरात किंवा देवाच्या मूर्तीजवळ ठेवू नयेत. माचिसची काडी पेटवल्यानंतर तिचे टोक मंदिरात टाकू नये. कारण जळलेल्या माचीसच्या काड्या नकारात्मकता वाढवतात, ज्यामुळे घरामध्ये अशुभ देखील होते.



वास्तुशास्त्रानुसार, माचिस किंवा लाइटरसारख्या ज्वलनशील वस्तू मंदिरात किंवा पूजा कक्षात तसेच बेडरूममध्ये ठेवू नयेत. असे केल्याने वैवाहिक जीवनावर नकारात्मक परिणाम होतो.


वास्तू दोष बनतात आर्थिक संकटाचे कारण


अनेकवेळा असे घडते की, काही घरांमध्ये पैशाची सतत कमतरता असते. पती-पत्नी दोघांनी मिळून कमावल्यानंतरही घरातील आर्थिक संकट संपताना दिसत नाही. अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च होतात. तुम्हाला हवं असलं तरी थोडे पैसेही वाचवता येत नाहीत. वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार, तुमच्या घरात असलेले वास्तू दोष आर्थिक संकटाचे कारण असू शकतात. वास्तुशास्त्रनुसार असे काही उपाय जाणून घ्या, जेणेकरुन तुम्ही अशा प्रकारच्या चूकांपासून दूर राहू शकता.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या :


Monthly Horoscope October 2023 : ऑक्टोबर महिन्यात 'या' राशींना अनेक लाभ, इतर राशींचे मासिक राशीभविष्य जाणून घ्या