Vastu Tips In Marathi : वास्तुशास्त्रात (Vastu Shashtra) ऊर्जेला विशेष महत्त्व आहे. वास्तूनुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीत सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते, ज्याचा प्रभाव घरातील सदस्यांवर पडतो. लाखो प्रयत्न करूनही तुम्हाला जीवनात यश मिळत नसेल किंवा तुमच्या कामात वारंवार अडथळे येत असतील तर तुम्ही वास्तुशास्त्रातील काही खास टिप्सचा उपयोग करू शकता. वास्तुचे हे सर्व उपाय फक्त तुमच्या घरात आहेत. वास्तूनुसार झोपताना उशीखाली काही खास गोष्टी ठेवल्याने घरात सुख-समृद्धी येते. वास्तुशी संबंधित या उपायांबद्दल जाणून घ्या (Vastu Tips In Marathi)



अख्ख्या मूगाचा विशेष उपाय


मंगळवारी रात्री मुगाची डाळ हिरव्या रंगाच्या कपड्यात बांधून उशीखाली ठेवून झोपा. सकाळी उठल्यावर एखाद्या मुलीला द्या किंवा मंदिरात दुर्गादेवीच्या चरणी ठेवा. असे केल्याने बुध ग्रहाचा अशुभ प्रभाव दूर होतो आणि करिअरमध्ये प्रगती होते. या उपायाने पती-पत्नीचे नातेही मधुर बनते.



लोखंडाच्या गोळ्या


जर तुमची वेळ चांगली नसेल किंवा तुम्हाला रात्री भयानक स्वप्न पडत असतील, तर उशीखाली लोखंडाच्या गोळ्या ठेवा. लोखंडी गोळ्या उपलब्ध नसल्यास, त्याऐवजी तुम्ही लोखंडी चावी किंवा छोटी कात्री ठेवू शकता. यामुळे राहू, केतूचे वाईट प्रभाव दूर होतात आणि जीवनातील नकारात्मकता दूर होते.



उशीखाली गीता किंवा सुंदरकांड ठेवा


वास्तूनुसार झोपताना उशीखाली गीता किंवा सुंदरकांड ठेवणे खूप फायदेशीर आहे. यामुळे मन शांत राहते आणि व्यक्तीच्या आत सकारात्मक ऊर्जा संचारते. वास्तूचे हे उपाय केल्याने दिवसभर ताजेतवाने राहते. तुम्ही कामाच्या ठिकाणी चांगले काम करू शकता. या वास्तु टिप्स जीवनात लाभ आणि प्रगती आणतात.



राहु दोष दूर करतो मुळा 


वास्तुशास्त्रानुसार रात्री उशीखाली मुळा ठेवून झोपणे चांगले मानले जाते. सकाळी मंदिरात जाऊन शिवलिंगावर हा मुळा अर्पण केल्याने राहु दोष दूर होतो. या उपायाने कामात वारंवार येणारे अडथळे दूर होतात.



सिंदूरची डब्बी


सोमवारी उशीखाली सिंदूरची छोटी डबी ठेवून झोपणे फायदेशीर आहे. दुसऱ्या दिवशी हनुमानजींना हे सिंदूर अर्पण करा. हा उपाय केल्याने अशुभ मंगळाचा प्रभाव दूर होऊन कार्यक्षेत्रात प्रगती होते.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Vastu Tips For Homes : नवीन घर घेताना किंवा बांधताना वास्तुशास्त्राचे हे नियम लक्षात ठेवा, सुखशांती नांदेल!