Vastu Tips : ज्योतिष शास्त्रानुसार, भौतिक जीवनात धन-संपत्ती, पैशांचं विशेष महत्त्व आहे. कारण यामुळे आपल्या दैनंदिन गरजा, सुख-सुविधा भागतात. ज्यांच्याकडे पैसा नसतो त्यांच्या नशिबात दारिद्र्य येते. त्यांची प्रगती होत नाही असं म्हणतात. अशा वेळी देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय केले जातात. जेणेकरुन इतरांप्रमाणे घरात पैसा यावा. हे उपाय नेमके कोणते आहेत ते जाणून घेऊयात.
ज्योतिष शास्त्रानुसार, जर तुम्हाला घरात सुख, शांती , संपत्ती आणि समृद्धी हवी असेल तर तुम्ही अखंड लक्ष्मी चिरकाळासाठी 4 दिशांचे उपाय करु शकता.
1. चांदीच्या ग्लासाचा उपाय
तुम्ही तुमच्या घराच्या ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर आणि पूर्व दिशेला चांदीचा ग्लास ठेवावा. त्या चांदीच्या ग्लासात तांदूळ भरुन ठेवा.
2. देवी लक्ष्मीच्या मूर्तीचा उपाय
तुमच्या घराच्या दक्षिण पूर्व दिशेला म्हणजेच आग्नेय दिशेला देवी लक्ष्मीचा फोटो लावा. या फोटोमध्ये धनसंपत्तीचा वर्षाव करतानाचा देवीचा फोटो हवा. हे स्थिर लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं.
3. लवंग-इलायचीचा उपाय
तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर पश्चिम दिशेला म्हणजेच वायव्य दिशेला लवंग, इलायची, दालचीनी आणि जायफळ ठेवावं. यावेळी जायफळ तोडून ठेवा. इलायची सोलून ठेवा जेणेकरुन त्याच्या बिया दिसतील.
4. मोरपंखाचा उपाय
तुम्ही घराच्या दक्षिण पश्चिम दिशेला म्हणजेच नैऋत्य दिशेला मोरपंख ठेवावा. तुम्ही जर हे चार उपाय केले तर तुमच्या घरात सुख-शांती, समृद्धी टिकून राहील. आणि देवी लक्ष्मीदेखील तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला आर्थिक भरभराट देईल.
हेही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)