Money Prosperity Happines : नवीन वर्ष 1 जानेवारी 2023 पासून सुरू होईल. शास्त्रानुसार नवीन वर्षात घराच्या मुख्य गेटवर काही शुभ गोष्टी लावल्याने नशीब सूर्यासारखे चमकेल. वर्षभर सुख, समृद्धी, संपत्ती येईल. वास्तूमध्ये घराचा मुख्य दरवाजा खूप महत्त्वाचा मानला जातो, येथूनच समृद्धी आणि समस्या दोन्ही येतात. घरातील वातावरण चांगले राहण्यासाठी नवीन वर्षात मुख्य दरवाजावर सूर्य यंत्र किंवा तांब्याची मूर्ती लावणे शुभ राहील. असं म्हणतात की, सूय यंत्र किंवा तांब्याची मुर्ती मुख्य दरवाजावर लावली तर घरात नकारात्मक ऊर्जा कधीच प्रवेश करत नाही. शिवाय यामुळे कुटुंबातील व्यक्तीच्या प्रगतीत कोणताही अडथळा येत नाही. एकमेकांबाबतचा आदर वाढतो.

  


घराच्या मुख्य उंबरठ्यावर घोड्याचा नाल टांगल्याने त्रास दूर होतात असे मानले जाते. याबरोबरच शनिदेवाची कृपा राहते. तसेच ते घर आणि कुटुंबाचे वाईट शक्तींपासून संरक्षण करते. चिनी धर्मग्रंथांमध्ये लाल रिबनमध्ये बांधलेली तीन नाणी सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचे प्रतीक मानली जातात. असे मानले जाते की त्यांना घराच्या मुख्य गेटवर टांगल्याने गरिबी नष्ट होते. याबरोबरच संपत्तीत वाढ होते. 


नवीन वर्षात घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक आणि ओमची मूर्ती किंवा चित्र लावू शकता. दरवाजाच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक लावले जाते. यामुळे वास्तुदोष दूर होतात. याबरोबरच शुभ गोष्टी घडतात. वर्षाच्या पहिल्या दिवशी माता लक्ष्मीची पाय असलेली रांगोळी मुख्य गेटवर काढा. यामुळे वर्षभर संपत्तीची कमतरता भासत नाही. घरात लक्ष्मी राहते. 


शुभतेचे प्रतीक असलेल्या गणपतीची मूर्ती बहुतेक घरांच्या मुख्य दारात ठेवली जाते. गणेशजींचे चित्र नेहमी मुख्य गेटवर आतून, पाठ बाहेरील बाजूस लावावे. अशा प्रकारे चित्र लावल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि सुख-समृद्धी राहते. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


संबंधित बातम्या


Astrology : 'या' राशीचे लोक पैशाच्या बाबतीत असतात भाग्यवान! कधीही नसते संपत्तीची कमतरता