Vastu for Scissors : आपल्या प्रत्येकाच्या घरात कात्री (Scissors) असते. पण, जर कात्री ठेवण्याची दिशा चुकीची असेल तर त्याचा नकळतपणे तुमच्या आयुष्यावर परिणाम होतो. या समस्यांमागचं कारणही आपल्याला कळत नाही. पण, याचा आपल्या आरोग्यावरच (Health) परिणाम होत नाही, तर मुलांवरही त्याचा विपरीत परिणाम होतो आणि आर्थिक नुकसानही होतं. 

  


कात्रीचा संबंध केतूशी आहे 


कात्री ही एक तीक्ष्ण वस्तू आहे जी केतूचे प्रतीक मानली जाते. जर केतू तुमच्या कुंडलीत वाईट असेल तर अशा तीक्ष्ण टोकदार वस्तू घरात योग्य दिशेने ठेवाव्यात. कात्री योग्य दिशेने ठेवल्यास घरात आनंद राहील तसेच मुलांचेही कल्याण होईल. त्याचबरोबर तुम्हाला कोणतीही आर्थिक समस्या भासणार नाही. 


गंजलेले ब्लेड आणि तीक्ष्ण वस्तू धोकादायक 


एखादी तीक्ष्ण किंवा टोकदार वस्तू काही कारणाने गंजली असेल तर ती चुकूनही घरात ठेवू नये. यामध्ये कात्री, चाकू तसेच धारदार नखे इत्यादींचा समावेश असू शकतो. अशा गंजलेल्या वस्तू घरात ठेवल्याने तुमचा केतू खराब होईल, म्हणूनच अशा वस्तू उचलून ताबडतोब घराबाहेर फेकून द्या. चांगला केतू जीवनात शांती तर देतोच पण आनंदही देतो. 


कात्री ठेवण्यासाठी योग्य दिशा 


कात्री ठेवण्याची योग्य दिशा दक्षिण-पश्चिम आहे. कात्रीबरोबरच कोणतीही धारदार वस्तू, टोकदार वस्तू, टूल बॉक्स इत्यादी देखील या दिशेने तुम्ही ठेवू शकता. जागा नसेल तर वायव्य दिशेलाही ठेवता येईल. कात्री कधीही लटकलेल्या अवस्थेत ठेवू नये. 


चुकीच्या ठिकाणी ठेवल्याने होईल नुकसान


योग्य दिशेने ठेवलेल्या या गोष्टी जीवनात सुख-शांती आणतात. मुलांची प्रगती होते आणि आर्थिक समस्याही दूर होतात. चुकून ईशान्य दिशेला कात्री लावल्यास मानसिक अस्वस्थता आणि गोंधळ कायम राहतो. कारण ईशान्य दिशा हे चंद्राचे स्थान आहे आणि चंद्र हा मनाचा कारक आहे. त्यामुळे या ठिकाणी कात्री ठेवल्याने मानसिक तणाव निर्माण होतो आणि नातेसंबंधांवर विपरीत परिणाम होतो. घरात आर्थिक संकट, अशांतता, संकटे निर्माण होतात. पश्चिम दिशेला कात्री ठेवल्यास आईच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तुम्हाला आर्थिक संकटाचाही सामना करावा लागू शकतो.  


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Hanuman Jayanti 2024 : हनुमान जयंतीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार करा हनुमानाची पूजा; बजरंगबली होतील प्रसन्न, मनातील इच्छा होतील पूर्ण