Vastu Tips For Money : आपलं जीवन नेहमी सुख-समृद्धीने भरलेलं असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक विविध उपाय करतात. घरातील तिजोरी नेहमी भरलेली राहावी यासाठी वास्तुशास्त्र (Vastu Shastra) आणि फेंगशुईमध्ये अनेक वस्तूंचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. घरातील आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी विविध वस्तूंचा वापर केला जातो, या वस्तूंमध्ये एक विशिष्ट सकारात्मक ऊर्जी असते, ज्यामुळे घराची भरभराट होते. अशा नेमक्या कोणत्या गोष्टी (Vastu Tips) आहेत ज्या घरात आणल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते? जाणून घेऊया.


विंड चाईम (Wind Chime)


विंड चाईम हे लहान झुंबरासारखं असतं, याच्या एकमेकांना आदळणाऱ्या छोट्या दांड्यांच्या आवाजातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते, यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते. वास्तुशास्त्रात विंड चाईम अतिशय शुभ मानलं जातं. यातून निघणारा गोड आवाज घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा आणतो. घरात नेहमी कलहाचं वातावरण असेल आणि घरातील सदस्यांमध्ये भांडणं होत असतील, तर याचं एक कारण घरात असलेली नकारात्मक ऊर्जा असू शकतं. म्हणून तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी तुम्ही विंड चाईम आणू शकता. वास्तूनुसार घरात विंड चाईम लावल्याने घरातील गरिबी दूर होते आणि घरात पैसा येतो. विंड चाईम लावल्याने घरावरील वाईट नजर देखील दूर होते.


लाफिंग बुद्धा (Laughing Buddha)


चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी लाफिंग बुद्धावर टाकलेली एक नजर पुरेशी असते. आनंदी दिसणारा हा फेंगशुई आयटम जीवनात सकारात्मकता वाढवतो. खरं तर, लाफिंग बुद्धाला आनंद आणि समृद्धीचा खजिना मानला जातो. लाफिंग बुद्धा घरात आनंद आणतो. लाफिंग बुद्ध घरात ठेवल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही, घरातील आर्थिक स्थिती सुधारते. हे लाफिंग बुद्धा ऑनलाईन आणि ऑफलाईन मिळतात. गिफ्ट स्वरुपात मिळालेला लाफिंग बुद्धा फार लकी समजला जातो.


बांबूचं रोप (Lucky Bamboo Plant)


बांबूचं छोटं झाड घरासाठी शुभ मानलं जातं. काचेच्या ग्लासात ठेवलेले छोटे लकी बांबू हे आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपयोगी मानले जातात. घराच्या पूर्व कोपऱ्यात बांबूचं झाड ठेवल्याने घरात सुख-समृद्धी टिकून राहते आणि घरात सकारात्मक ऊर्जा पसरते. बांबूचं रोप घरात ठेवल्याने घरातील सर्व सदस्य निरोगी राहतात. घरात पैशाची आवक होत राहते.


अ‍ॅक्वॅरियम (Aquarium)


वास्तुशास्त्रात मासे हे सौभाग्याचे सूचक मानले जातात. घरात अ‍ॅक्वॅरियम, म्हणजेच फिश टँक असणं ही समृद्धीची निशाणी आहे. ज्या घरात फिश टँक आहे, त्या घरात सुख-समृद्धी टिकून राहते, असं म्हणतात. फिश टँक नेहमी घराच्या उत्तर दिशेला ठेवावं. उत्तर ही संपत्तीची दिशा आणि कुबेर देवाची दिशी मानली जाते. उत्तर दिशेला फिश टँक ठेवल्याने घरात समृद्धी येते, असं म्हटलं जातं.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Vastu Tips : पोळपाट लाटण्यामुळे येऊ शकते गरिबी; विश्वास बसत नसेल तर वाचा