Vastu Tips For Milk : वास्तू शास्त्रानुसार (Vastu Shastra), दैनंदिन जीवनातील कामांशी संबंधित देखील अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर त्याचा शुभ-अशुभ परिणाम देखील सांगण्यात आला आहे. त्यानुसार, आठवड्याच्या प्रत्येक दिवसाशी संबंधित देखील काही नियम सांगण्यात आले आहेत. आज आपण दुधाशी (Milk) संबंधित अशाच काही गोष्टींच्या संदर्भात जाणून घेणार आहोत.
दूध उतू जाणं
खरंतर, दुधाचं उतू जाणं शुभ मानलं जात नाही. पण, जर वारंवार दूध उतू जात असेल तर याचा अर्थ देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज आहे. आणि लवकरच तुम्हाला धनहानी, गरीबी, किंवा आर्थिक नुकसानीला सामोरं जाण्याची शक्यता आहे. असा हा संकेत आहे. तसेच, काही संकट तुमच्यावर ओढावणार आहे असा सूचक इशाराही यामागे देण्यात येतो.
त्याचबरोबर, दुधाचं जळणं देखील शुभ मानलं जात नाही. कधीतरी अचानक तुमच्याबरोबर असा प्रकार घडल्यास ठीक आहे. पण, वारंवार जर दूध जळत असेल तर वेळीच सावधानता बाळगा. अन्यथा तुमचा पुढचा काळ फार आव्हानात्मक असेल.
बुधवारी दुधाचं जळणं पडू शकतं भारी
ज्योतिष शास्त्रानुसार, बुधवारच्या दिवशी दूध जळणं फार अशुभ मानलं जातं. यामुळे तुमच्या नोकरी-व्यवसायात प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमचा पैसा येण्याच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे बुधवारच्या दिवशी तुम्ही याची खात्री बाळगणं गरजेचं आहे. यापेक्षा तुम्ही या दिवशी खीर किंवा कोणतेही गोडाचे पदार्थ ज्यामध्ये दुधाचा समावेश आहे असे पदार्थ बनवू नये.
बुधवारी चुकूनही 'हे' काम करु नका
प्रचंड धनहानी, प्रगतीत अडथळे, व्यवसायात नुकसान यांपासून वाचण्यासाठी बुधवारच्या दिवशी काही इतर गोष्टींची देखील काळजी घेणं गरजेचं आहे. जसे की, बुधवारच्या दिवशी चुकूनही पैशांची देवाण-घेवाण करु नका. अगदीच महत्त्वाचं असेल तरच देवाण-घेवाण करा.
बुधवारच्या दिवशी उत्तर, पश्चिम आणि ईशान्य दिशा या नेहमी दिशाभूल करणाऱ्या आहेत त्यामुळे बुधवारच्या दिवशी या दिशेने प्रवास करणं टाळा. अन्यथा तुमचा प्रवास बिघडू शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :