Vastu Tips For Evening : आपल्या जीवनात सुख-शांती नांदावी असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करतो. आज आम्ही तुम्हाला असेच काही उपाय सांगणार आहोत जे संध्याकाळच्या वेळी करणं गरजेचं आहे. संध्याकाळच्या वेळी या वस्तू दान केल्याने तुम्हाला फक्त धनलाभच मिळत नाही तर नकारात्मक ऊर्जेपासून देखील दूर राहता. हे उपाय नेमके कोणते ते जाणून घेऊयात.
संध्याकाळच्या वेळी लवंग घालून दिवा लावा
आपल्या इष्ट देव-दैवतांना प्रसन्न करण्यासासाठी संध्याकाळच्या वेळी देवी लक्ष्मीसमोर मोहरीच्या तेलात लवंग घाला. हा साधा आणि सोपा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील अनेक समस्या दूर होतील.
संध्याकाळच्या वेळी मातीत कोथिंबीर घाला
संध्याकाळच्या वेळी थोड्याशा मातीमध्ये कोथिंबीरच्या बिया घाला. आता या कुंडीत 21 रूपयांची नाणी एका भांड्यात घाला. या मातीत थोडं थोडं पाणी घाला. या भांड्याला उत्तर दिशेला ठेवा. आणि त्यात नियमित पाणी घाला. यामुळे धनप्राप्ती होण्याचे योग जुळून येतात. त्याचबरोबर तुमच्या नोकरी आणि व्यवसायातही चांगला लाभ होईल.
संध्याकाळी जनावरांना अन्न
एखाद्या भुकेलेल्याला अन्न दिल्याने आपल्याला पुण्य मिळतं असं म्हणतात. अशा वेळी जनावराला अन्न दिल्याने आपल्याला पुण्य मिळतं असं म्हणतात. तसेच, जनावरावर किंवा श्वानावर भगवान विष्णूची विशेष कृपा असे असं म्हणतात. तसेच, अशी मान्यता आहे की, जनावरांचा आशीर्वाद आणि शाप लवकरच व्यक्तींना लागतो. त्यामुळे कोणत्याही जनावरांचं मन दुखवू नये. तसेच, प्रत्येक संध्याकाळी जनावरांना जसे की, श्वान, गाय यांना चपाती किंवा अन्नदान करा.
संध्याकाळच्या वेळी रोपांना पाणी द्या
संध्याकाळच्या वेळी रोपांना पाणी घालणं पर्यावरणाच्या दृष्टीने शुभ मानलं जातं. त्याबरोबरच यामुळे तुम्हाला पुण्य फळ मिळतं. संध्याकाळच्या वेळी रोपांना पाणी घातल्याने नऊग्रहांची शांती होते. आणि घरात सुख-समृद्धीचा वास राहतो.
संध्याकाळी रिकाम्या हाती घरी जाऊ नका
जर तुम्ही नोकरीसाठी किंवा एखाद्या कामासाठी घराच्या बाहेर असाल तर संध्याकाळी घरी येताना काहीतरी वस्तू हातात घेऊन या. अशा वेळी तुम्ही फळं, भाज्या किंवा खाण्याचं सामान घेऊन जा. यामुळे घरात आनंद राहतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :