Vastu Tips: अनेकदा आपण पाहतो, बऱ्याचदा मेहनत करुनही, बरेच कष्ट करूनही माणसाच्या हातात पैसा नसतो आणि तो पैशाच्या समस्यांशी झगडत राहतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या घरातील या छोट्या छोट्या गोष्टींची वास्तूशास्त्रानुसार काळजी घेतली तर तुम्हाला तुमच्या परिस्थितीत बरेच फायदे मिळू शकतात. असे मानले जाते की दैनंदिन जीवनात वास्तु नियमांची काळजी घेतल्यास घरात सकारात्मक ऊर्जा राहते. शिवाय, यामुळे कुटुंबात आनंदी वातावरण राहते. वास्तुशास्त्राचे नियम घरात ठेऊन तुम्हाला आर्थिक समस्यांपासूनही आराम मिळू शकतो. चला जाणून घेऊया अशाच काही वास्तु टिप्स.


पैसा कोणत्या दिशेला ठेवायचा?


वास्तुशास्त्रात उत्तर दिशा खूप महत्त्वाची मानली जाते. अशा स्थितीत घरातील तिजोरी, दागिने आणि आर्थिक कागदपत्रे नैऋत्य दिशेला अशा प्रकारे ठेवावीत की त्याचे तोंड उत्तरेकडे उघडेल. असे केल्याने तिजोरी कधीच रिकामी होत नाही.


या गोष्टी घरी ठेवा


घरामध्ये मनी प्लांट आणि बांबू सारखी रोपे लावा, कारण वास्तुनुसार ही झाडे पैसा आणि सकारात्मक उर्जा आकर्षित करतात. यासोबत घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर नेम प्लेट्स, विंड चाइम्स आणि झाडे लावा. यासोबतच घराच्या ईशान्य कोपऱ्यात एक्वैरियम किंवा छोटा कारंजा ठेवू शकता.
यामुळे एखाद्या व्यक्तीला त्याच्या आर्थिक स्थितीतही फायदा दिसू शकतो. परंतु ईशान्य कोपऱ्यात कधीही घाण साचू देऊ नका, या दिशेला कोणतीही जड वस्तू इत्यादी ठेवू नका, अन्यथा सकारात्मक उर्जेच्या आगमनात अडथळा निर्माण होतो.


या गोष्टी लक्षात ठेवा


घरामध्ये पाण्याची गळती होणार नाही याची विशेष काळजी घ्या, कारण वास्तुशास्त्रात हे आर्थिक नुकसानीचे प्रतीक मानले जाते. अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात गळती असेल तर ती त्वरित दुरुस्त करावी. यासोबतच रात्री किचनमध्ये भांडी टाकून कधीही झोपू नका. असे केल्याने व्यक्तीला पैशाच्या समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.


हेही वाचा>>


Shani Dev: शनिदेवांचा होणार न्याय! अवघे 10 दिवस शिल्लक, 'या' 4 राशींनी सावधान! छोटीशी चूक सुद्धा पडेल महागात 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)