Vastu Tips : वास्तुशास्त्रात (Vastu Shastra) देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. असं म्हणतात की, हे उपाय केल्याने देवी लक्ष्मीची तुमच्यावर सदैव कृपा असते. आणि तुमची तिजोरी जीवनात नेहमी धनाने भरलेली राहते. वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी तिजोरीत ठेवल्यास अडकलेले पैसे मिळण्यास मदत होते आणि जीवनात पैशांची कमतरता कधीच भासत नाही.


सनातन धर्मात वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व आहे. वास्तुशास्त्रात अशाच काही उपायांचे वर्णन करण्यात आले आहे, ज्याचे पालन केल्यास घरामध्ये धन-संपत्तीमध्ये अपार वाढ होते आणि सुख-समृद्धी येते. 


वास्तुशास्त्रानुसार तिजोरीत काही वस्तू ठेवल्याने व्यक्तीला धनदेवतेचा आशीर्वाद मिळतो आणि तिजोरी जीवनात नेहमी पैशाने भरलेली राहते. त्यामुळे अशा कोणत्या वस्तू तिजोरीत ठेवाव्यात ज्यामुळे पैसा खेळता राहील ते जाणून घेऊयात. 


'या' वस्तू तिजोरीत ठेवा



  • सनातन धर्मात हळदीचा उपयोग शुभ आणि मंंगलमय कार्यासाठी केला जातो. याशिवाय भगवान विष्णूच्या पूजेच्या वेळी हळदीचा वापर केला जातो. तिजोरीत हळदीचा एक गोळा ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे घरातील सदस्यांवर देवी लक्ष्मीची कृपा राहते.

  • जर तुम्हाला आयुष्यात पैशांशी संबंधित समस्या येत असतील तर पिंपळाच्या पानावर लाल शेंदूर लावून ओम लिहा. यानंतर ते तिजोरीत ठेवा. हा उपाय सलग पाच शनिवारी करा. असे म्हणतात की, हा उपाय केल्याने धनाशी संबंधित समस्या दूर होतात.

  • जर पैसे तुमच्या तिजोरीत राहत नसतील तर याचं सर्वात मोठं कारण तिजोरीतील रंगदेखील असू शकतो. तिजोरीच्या आतील रंग लाल असावा असे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार तिजोरीचा रंग लाल असेल तर पैसा खेळू लागतो.


तिजोरीजवळ झाडू ठेवू नये


तिजोरीत लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार तिजोरीजवळ झाडू ठेवण्यास मनाई आहे. असे मानले जाते की यामुळे घरामध्ये गरिबी येते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


May Month Planet Transit 2024 : मे महिन्यात गुरुसह चार मोठ्या ग्रहांच्या हालचाली; 'या' राशीच्या लोकांचं भाग्य उजळणार,आयुष्यात घडतील महत्त्वाचे बदल