Car Number Plate Numerology: आयुष्यात घर, चांगली नोकरी आणि महागडी गाडी असणं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यापैकी तुमचं घर आणि गाडी कितीही महागडी असू द्या, पण वास्तुशास्त्रानुसार जो पर्यंत घराची दिशा आणि गाडीचा नंबर योग्य नसेल, तोपर्यंत त्याची सकारात्मक उर्जा तुमच्या आयुष्यात येणार नाही. जर तुम्हाला सांगण्यात आले की, तुमच्या कारची नंबर प्लेट तुमचे आयुष्य बदलू शकते का? तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण अंकशास्त्रानुसार, प्रत्येक संख्येमध्ये एक विशेष ऊर्जा असते, जी तुमच्या नशिबावर प्रभाव टाकू शकते. योग्य संख्या निवडल्यास यश मिळू शकते, परंतु चुकीची संख्या निवडल्यास अडचणी येऊ शकतात. जाणून घ्या..
कारच्या नंबर प्लेटचा व्यक्तीच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो?
नवीन वर्ष येताच आपण नवीन योजना आणि उद्दिष्टे ठरवतो. यापैकी बऱ्याच लोकांसाठी नवीन कार खरेदी करणे हे एक मोठे स्वप्न असू शकते. पण तुमच्या कारच्या नंबर प्लेटचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो असा विचार तुम्ही केला आहे का? अंकशास्त्रानुसार, प्रत्येक संख्येमध्ये एक विशेष ऊर्जा असते, जी तुमच्या जीवनातील अनेक पैलूंवर परिणाम करू शकते. एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार प्रसिद्ध ज्योतिषी आणि वास्तु तज्ज्ञ पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी सांगितले की कोणते अंक शुभ आहेत, कोणते अशुभ आणि कोणते तटस्थ म्हणजेच न्यूट्रल आहेत.. जाणून घ्या...
भाग्यवान अंक - प्रगती आणि यशात मदत करू शकतात
अंकशास्त्रात, काही संख्या तुमच्या उर्जेशी अधिक चांगल्या प्रकारे जुळवून घेतात आणि त्यांना 'फ्रेंडली नंबर' म्हणतात. हे अंक तुमच्या जीवनात सुख, शांती आणि यश घेऊन येतात. उदाहरणार्थ, 1, 3 आणि 5 हे भाग्यवान क्रमांक मानले जातात. जर तुमच्या कारच्या नंबर प्लेटवर हे नंबर असतील तर ते तुमच्या प्रगती आणि यशात मदत करू शकतात.
अशुभ क्रमांक - यश मिळवणे कठीण होऊ शकते
दुसरीकडे, काही संख्या तुमच्या उर्जेशी जुळत नाहीत आणि त्यांना ‘एनिमी नंबर’ म्हणतात. अशा संख्येचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि समस्या वाढू शकतात. 4, 6 आणि 8 या श्रेणीत ठेवण्यात आले आहेत. तुमच्या नंबर प्लेटवर हे नंबर असल्यास, ते तुमच्यासाठी आव्हाने वाढवू शकतात आणि यश मिळवणे कठीण करू शकतात.
तटस्थ संख्या
अशा काही संख्या आहेत, ज्या फारशा फायदेशीर किंवा हानिकारक नाहीत. त्यांना ‘न्यूट्रल नंबर’ म्हणतात. 2, 7 आणि 9 या श्रेणीत ठेवण्यात आले आहेत. तुमच्या नंबर प्लेटवर हे नंबर असल्याने तुम्हाला कोणताही मोठा फायदा किंवा मोठे नुकसान होणार नाही. तुमच्या नवीन कारसाठी नंबर प्लेट निवडताना तुमचा 'डेस्टिनी नंबर' शोधणे फायदेशीर ठरू शकते.
डेस्टिनी नंबर कसा शोधायचा?
तुमच्या जन्मतारखेवरून तुमचा डेस्टिनी नंबर शोधणे खूप सोपे आहे. उदाहरणार्थ, जर तुमची जन्मतारीख 30/07/1989 असेल, तर हे क्रमांक जोडा:
3 + 0 + 0 + 7 + 1 + 9 + 8 + 9 = 37
3 + 7 = 10
1 + 0 = 1
वाहनाची नंबर प्लेट आयुष्यात आनंद, सौभाग्य आणू शकते!
जर तुमचा भाग्यांक 1 असेल तर तुमच्यासाठी 1, 2, 3, 5, 6 आणि 9 हे भाग्यशाली अंक मानले जातात. जर तुमच्या वाहनाची नंबर प्लेट या क्रमांकांशी जुळत असेल तर ते तुमच्या आयुष्यात आनंद आणि सौभाग्य आणू शकते. त्यामुळे जेव्हाही तुम्ही कार खरेदी कराल, तेव्हा तिच्या नंबर प्लेटकडे लक्ष द्या आणि अंकशास्त्रानुसार योग्य क्रमांक निवडा.
हेही वाचा>>>
Numerology: जोडीदारासाठी काहीही करण्यास तयार असतात 'या' जन्मतारखेचे लोक? शनीची असते कृपा, अंकशास्त्रानुसार जाणून घ्या.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )