Tulsi Vivah 2025 : शास्त्राप्रमाणे, दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला तुळशी विवाह (Tulsi Vivah) साजरा करण्याची परंपरा आहे. या दिवशी तुळशीचा विवाह शालिग्रामबरोबर लावला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, तुळशी विवाह केल्याने वैवाहिक जीवनातील ताणतणाव, संघर्ष आणि समस्या दूर होतात. त्यामुळे दिवाळी तर झाली आहे पण आता तुळशी विवाहाची लगबग आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतेय. त्यानुसार, तुळशी विवाहाची तारीख, विधी आणि पूजेची योग्य पद्धत जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

तुळशी विवाह नेमका कधी? (Tulsi Vivah Date 2025)

द्वादशी तिथीची सुरुवात : 2 नोव्हेंबर 2025 रोजी, सकाळी 07:31 वाजता.द्वादशी तिथीची समाप्ती : 3 नोव्हेंबर 2025 रोजी, सकाळी 05:07 वाजता.उदय तिथीनुसार, तुळशी विवाह 2 नोव्हेंबर 2025 रोजी साजरा केला जाईल.

तुळशी विवाह शुभ मुहूर्त 2025 (Tulsi Vivah Shubh Muhurta 2025)

सूर्योदय: सकाळी 06:34 वाजतासूर्यास्त: संध्याकाळी 05:35 वाजताचंद्रोदय: दुपारी 03: 21 वाजताचंद्रोदय: सकाळी 03:50 वाजता3 नोव्हेंबर रोजी सकाळी 03:50 वाजताब्रह्म मुहूर्त - सकाळी 04:50 ते सकाळी 05:42 वाजता

Continues below advertisement

तुळशी विवाहाचं महत्त्व (Tulsi Vivah Importance)

हिंदू धर्मानुसार, तुळशीला पूजनीय मानलं जातं. तर, शास्त्रानुसार, तुळशीची पूजा केल्याने आणि संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावल्याने घरात सुख-शांती टिकून राहते. तसेच, घरातील आर्थिक स्थितीदेखील चांगली राहते. तुळशी विवाह केल्याने वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतात. तर, पती-पत्नीच्या नात्यात जिव्हाळा वाढतो. नातं घट्ट होतं. 

तुळशी विवाहाच्या दिवशी 'हे' उपाय करा 

तुळशी विवाहाच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने दारिद्र्य दूर होते आणि जीवनात सुख-समृद्धी वाढते. तसेच, अखंड सौभाग्याचं वरदान हवं असल्यास तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीला 16 श्रृंगार चढवा. तसेच, देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तळशीभोवती 7 वेळा परिक्रमा करा. तुळशी विवाहाला देवी तुळशीची आरती करणं शुभ मानलं जातं. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :                                                                                       

Kartik Purnima 2025 : यंदा 4 की 5 नोव्हेंबर? कार्तिक पौर्णिमा नेमकी कधी? वाचा शुभ मुहूर्त, पूजा, विधी आणि देव दिवाळीचं महत्त्व