एक्स्प्लोर

Tulsi Vivah 2025 : तुळशी विवाहाच्या दिवशी शुक्र ग्रहाच्या संक्रमणाचा शुभ योग; 'या' 3 राशींवर पडणार पैशांचा धो-धो पाऊस, विवाहाचेही शुभ योग

Tulsi Vivah 2025 : तुळशी विवाहाच्या दिवशी शुक्र ग्रहाचं संक्रमण होणार आहे. हा ग्रह तूळ राशीत असणार आहे. शुक्र ग्रहाचं तूळ राशीत प्रवेश केल्याने मालव्य राजयोग निर्माण होणार आहे.

Tulsi Vivah 2025 : हिंदू पंचांगानुसार, यंदा 2 नोव्हेंबर 2025 रोजी तुळशी विवाह (Tulsi Vivah) साजरा केला जाणार आहे. पंचांगानुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वादश तिथीला तुळशी विवाह साजरा करतात. ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने यंदाचा तुळशी विवाह फार खास मानला जाणार आहे. कारण, या दिवशी शुक्र ग्रहाचं संक्रमण होणार आहे. हा ग्रह तूळ राशीत असणार आहे. शुक्र ग्रहाचं तूळ राशीत प्रवेश केल्याने मालव्य राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे तुळशी विवाहाच्या दिवशी शुक्र ग्रहाच्या संक्रमणाने कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात. 

मालव्य राजयोगाचं महत्त्व

मालव्य राजयोग हा पंच महापुरुष योगांपैकी एक अत्यंत शुभ योग मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार सौंदर्य, प्रेम, भौतिक सुख, कला आणि समृद्धीचा कारक असलेल्या शुक्र ग्रहाच्या विशिष्ट स्थितीमुळे हा योग तयार होतो. जेव्हा शुक्र ग्रह स्वतःच्या राशीत म्हणजेच वृषभ किंवा तूळ राशीत किंवा आपल्या उच्च राशीत म्हणजेच मीन राशीत असतो आणि तो केंद्रस्थानी स्थित असतो, तेव्हा हा योग तयार होतो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा योग तयार होतो, त्यांना देवी लक्ष्मीची विशेष कृपा लाभते. अशा व्यक्ती जीवनात प्रचंड धन-संपदा, ऐश्वर्य, उच्च शिक्षण, आकर्षक व्यक्तिमत्त्व, कला आणि विलासी जीवन अनुभवतात. मालव्य राजयोगामुळे प्रेम संबंधांमध्ये स्थिरता येते आणि दांपत्य जीवन सुखी होते.

कन्या रास (Virgo Horoscope)

शुक्र ग्रहाचं संक्रमण कन्या राशीसाठी लाभदायक ठरणार आहे. या दिवशी तुम्हाला लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. ज्या लोकांच्या नात्यात तणाव सुरु होता तो आता हळुहळू कमी होईल. नात्यात गोडवा निर्माण झालेला दिसेल. तसेच, या काळात तुम्ही काही शुभ निर्णय देखील घेऊ शकता. तुमच्या आयुष्यात सुख शांती नांदेल. 

तूळ रास (Libra Horoscope)

शुक्र ग्रहाचं संक्रमण तूळ राशीसाठी फार लाभदायी ठरणार आहे. तुमचे जुने गैरसमज दूर होतील. तसेच, या काळात तुम्ही एखाद्या नवीन वस्तूची देखील खरेदी करु शकता. घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल. तसेच, तुमच्या वाणीत गोडवा निर्माण होईल. या काळात तुमचं घर आणि करिअर दोघांमध्ये स्थिरता दिसून येईल. 

मीन रास (Pisces Horoscope)

शुक्र ग्रहाचं संक्रमण मीन राशीसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या काळात अनेक प्रवासाचे योग जुळून येतील. नवीन अनुभवांतून तुम्हाला खूप काही शिकता येईल. तुमचं प्रेम जीवन चांगलं राहील. तसेच, ग्रहांच्या शुभ संक्रमणामुळे तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा :         

Guru Shani Gochar 2026 : नव्या वर्षाची सुरुवातच होणार धमाकेदार! 'या' राशींवर असणार गुरु-शनिचा आशीर्वाद, हातात मिळालेल्या संधीचं सोनं कराल

महत्त्वाच्या बातम्या

Diwali 2026 : दिवाळीत 'या' 7 चुका टाळा! देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी 'हे' महत्त्वाचे नियम अजिबात विसरू नका...अन्यथा...
दिवाळीत 'या' 7 चुका टाळा! देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी 'हे' महत्त्वाचे नियम अजिबात विसरू नका...अन्यथा...
Shani Sade Sati: दिवाळीनंतर 3 राशींनी सावधान, साडेसातीचं वादळ घोंगावतंय! पुढच्या काळात 'या' 6 चुका चुकूनही करू नका, काय काळजी घ्याल? ज्योतिषशास्त्र...
दिवाळीनंतर 3 राशींनी सावधान, साडेसातीचं वादळ घोंगावतंय! पुढच्या काळात 'या' 6 चुका चुकूनही करू नका, काय काळजी घ्याल? ज्योतिषशास्त्र...
Horoscope Today 7 November 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 7 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ नेमक्या कोणत्या राशीला मिळणार? आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 7 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ नेमक्या कोणत्या राशीला मिळणार? आजचे राशीभविष्य
Diwali 2026: 8 नोव्हेंबरला नरक चतुर्दशी - लक्ष्मीपूजन एकाच दिवशी! अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजनाचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका; दिवसभरातील पूजा, धार्मिक महत्व...
8 नोव्हेंबरला नरक चतुर्दशी - लक्ष्मीपूजन एकाच दिवशी! अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजनाचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका; दिवसभरातील पूजा, धार्मिक महत्व...

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul President Election 2026 : मुश्रीफांनी पाठिंबा मागणं हास्यास्पद; त्यांना हे शोभत नाही...., गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफांनी सतेज पाटलांना दिलेल्या ऑफरवर हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया
मुश्रीफांनी पाठिंबा मागणं हास्यास्पद; त्यांना हे शोभत नाही...., गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफांनी सतेज पाटलांना दिलेल्या ऑफरवर हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया
Beed Crime News: बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणार्‍यांचे रॅकेट उघडकीस आणलं, वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांत गुन्हा दाखल, बीडमध्ये खळबळ
बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणार्‍यांचे रॅकेट उघडकीस आणलं, वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांत गुन्हा दाखल, बीडमध्ये खळबळ
Satej Patil on Gokul Chairman Election 2026: सतेज पाटलांनी कोल्हापूरपासून 1100 किलोमीटर लांब जाऊन बसलेल्या महायुतीच्या 12 संचालकांची खडा न खडा माहिती काढली, हॉटेलमधील रुम नंबरही सांगितले
सतेज पाटलांनी कोल्हापूरपासून 1100 किलोमीटर लांब जाऊन बसलेल्या महायुतीच्या 12 संचालकांची खडा न खडा माहिती काढली, हॉटेलमधील रुम नंबरही सांगितले
Agristack : महायुती सरकारचा ॲग्रीस्टॅकबाबत मोठा निर्णय,  'या' शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळण्याचा मार्ग मोकळा, शासन निर्णय जारी... 
फडणवीस सरकारचा ॲग्रीस्टॅकबाबत मोठा निर्णय,  'या' शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळण्याचा मार्ग मोकळा, शासन निर्णय जारी...
IND vs NZ : दुसऱ्या वनडेला पावसाचा फटका, मॅच 47-47 षटकांची होणार, शुभमन गिलनं टॉस जिंकत घेतला मोठा निर्णय, भारताकडे मालिकेत आघाडी घेण्याची संधी
दुसऱ्या वनडेला पावसाचा फटका, मॅच 47-47 षटकांची होणार, शुभमन गिलनं टॉस जिंकत घेतला मोठा निर्णय
Share Market : अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 35 वर्षातील दमदार कामगिरी, सलग 7 सत्रात 10 टक्के तेजी...
अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 7 दिवसात 35 वर्षातील दमदार कामगिरी
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
Maharashtra Live blog updates: वैभव चव्हाण आत्महत्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
Maharashtra Live blog updates: वैभव चव्हाण आत्महत्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
Embed widget