Tripushkar Yog 2026 : 16 जूनला जुळून येतोय 'त्रिपुष्कर योग'; 'या' 4 राशींना लागणार लॉटरी, पैसा, नोकरी, करिअरला मिळणार नवी दिशा
Tripushkar Yog 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा खास वार, काही तिथी आणि विशेष नक्षत्र एकत्र येतात तेव्हा त्रिपुष्कर योग जुळून येतो. हा काळ एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी शुभ मानला जातो.

Tripushkar Yog 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, काही खास योग असे असतात जे आयुष्यात सकारात्मक बदल घडूवन आणतात. असाच एक शुभ संयोग आहे ज्याला त्रिपुष्कर योग म्हणतात. हा योग 16 जून रोजी जुळून येणार आहे. असं म्हणतात की हा योग काही राशींच्या जीवनात सकारात्मक बदल घेऊन येणार आहे. या राशींना चांगलाच लाभ मिळणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा खास वार, काही तिथी आणि विशेष नक्षत्र एकत्र येतात तेव्हा त्रिपुष्कर योग जुळून येतो. हा काळ एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी, पैशांच्या गुंतवणुकीसाठी तसेच, महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी फार चांगला मानला जातो. त्यामुळे कोणत्या राशींसाठी हा काळ खास आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी त्रिपुष्कर योग फार लाभदायी ठरणार आहे. हा काळ पैशांची गुंतवणूक करण्यासाठी फार चांगला मानला जातो. तसेच, या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊल. आरोग्याच्या बाबतीत हा काळ सकारात्मक असणार आहे. तसेच, या काळात तुम्ही एखाद्या कार्याची सुरुवात करु शकता.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रगतीचा असणार आहे. या काळात नोकरी आणि व्यवसायात तुमच्यासाठी चांगले दिवस येऊ शकतात. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. घरात आनंदाचं वातावरण असेल. तसेच, तुमची अनेक रखडलेली कामे तुम्ही या काळात पूर्ण करु शकता.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रगतीचा असणार आहे. मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, तुमच्या उत्पन्नात चांगली भरभराट दिसून येईल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. तुम्ही घेतलेल्या मेहनतीचं तुम्हाला चांगलं फळ मिळेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. या काळात तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. धनसंपत्तीच्या बाबतीत तुम्हाला शुभवार्ता मिळेल. घरातील वातावरण आनंदी असेल. तसेच, वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला लाभ मिळेल.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Numerology : Logic आणि Ego चं कॉम्बिनेशन असतात 'या' जन्मतारखेचे लोक; बोलण्यात एकदम पटाईत, कधीच हार मानत नाहीत



















