Trigrahi Yog 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, एप्रिलच्या (April 2026)महिन्यासा सुरुवात झाली आहे. एप्रिल महिन्याची सुरुवातच मोठ्या ग्रहांच्या संक्रमणाने होणार आहे. या कालावधीत 2 एप्रिल 2026 रोजी म्हणजेच आज साहस, शौर्य आणि पराक्रमाचा कारक मंगळ ग्रह (Mangal Gochar) संक्रमण करुन मीन राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी मंगळ ग्रहाची सूर्य आणि शनिबरोबर (Shani Dev) युती होणार आहे. त्यामुळे त्रिग्रही योगाची निर्मिती होईल. हा योग तीन राशींसाठी (Zodiac Signs)फार लाभदायी ठरणार आहे.
या ठिकाणी मंगळ ग्रहाची शनिबरोबर युती चांगली मानली जाणार नाही. कारण यामुळे विस्फोटक योग निर्माण होईल. मात्र, त्रिग्रही योग तुम्हाला शुभ परिणाम देऊ शकेल. मंगळ ग्रह 2 एप्रिल 2026 ते 11 मे 2026 या कालावधीपर्यंत मीन राशीत असणार आहे. तर, 14 एप्रिल 2026 रोजी सूर्य मीन राशीतून निघून मेष राशीत जाणार आहे.
मेष रास (Aries Horoscope)
त्रिग्रही योग मेष राशीच्या लोकांसाठी फार लकी ठरणार आहे. या कालावधीत तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच, जे बेरोजगार आहेत त्यांना चांगला रोजगार मिळेल. त्याचबरोबर, तुमच्या आर्थिक संपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. येणाऱ्या कालावधीत तुम्हाला नक्कीच शुभवार्ता मिळेल.
धनु रास (Saggitarius Horoscope)
त्रिग्रही योगाच्या निर्मितीने धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभकारक ठरणार आहे. या दरम्यान नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. त्यामुळे तुम्ही हाती घेतलेल्या कामांना चांगली गती मिळेल. तसेच, तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला या कालावधीत पूर्ण करता येतील. धनु राशीच्या लोकांना या काळात संपत्तीचा लाभ घेता येईल.
मीन रास (Pisces Horoscope)
त्रिग्रही योग मीन राशीच्या लोकांसाठी चांगला ठरणार आहे. या काळात तुम्हाला नोकरी व्यवसायात चांगला लाभ मिळेल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळेल. तसेच, तुमच्या आत्मविश्वासातही चांगली वाढ झालेली दिसेल. या काळात तुम्हाला कठीण वाटत असलेली कामेही तुम्ही अगदी सहजतेने पूर्ण कराल. मार्गातील सगळे अडथळे दूर होतील.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
