Trigrahi Yog 2025 : तब्बल 50 वर्षांनंतर जुळून येणार 'त्रिग्रही योग'; सूर्य, बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींचा गोल्डन टाईम सुरु
Trigrahi Yog 2025 : बुध ग्रह 6 जून रोजी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. तर, सूर्य ग्रह 15 जून रोजी मिथुन राशीत असणार आहे. याच राशीत गुरु ग्रह बृहस्पती मिथुन राशीत आधीपासूनच विराजमान आहे.

Trigrahi Yog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक कालावधीनंतर संक्रमण करुन त्रिग्रही आणि चतुर्ग्रही योग (Yog) निर्माण करतात. याचा प्रभाव सर्व राशींवर पाहायला मिळतो. जून महिन्यात बुध, सूर्य आणि गुरु ग्रह मिळून त्रिग्रही योग (Trigrahi Yog) जुळून येणार आहे. बुध ग्रह 6 जून रोजी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. तर, सूर्य ग्रह 15 जून रोजी मिथुन राशीत असणार आहे. याच राशीत गुरु ग्रह बृहस्पती मिथुन राशीत आधीपासूनच विराजमान आहे. यामुळे अनेक राशींच्या लोकांचं भाग्य उजळू शकतं. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
त्रिग्रही योग वृषभ राशीच्या लोकांसाठी फार अनुकू ठरणार आहे. या योगामुळे या राशीच्या लोकांना दुय्यम स्थानी या योगाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला अचानक धनलाभ मिळेल. तसेच, व्यापारी वर्गातील लोकांच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. अनेक नवीन योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही सक्षम असाल. या काळात तुमची आर्थिक स्थिती देखील चांगली असेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग जुळून आल्यामुळे फार लाभ मिळणार आहे. या राशीच्या कर्म भावात हा योग जुळून आला आहे. त्यामुळे जे तरुण नोकरीच्या शोधा आहेत त्यांना चांगली नोकरी मिळेल. तुम्ही आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली सुधारली असेल. भौतिक सुख-सुविधांचा तुम्हाला लाभ घेता येईल. या कालावधीत तुम्हाला नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल.
मीन रास (Pisces Horoscope)
त्रिग्रही योग जुळून आल्यामुळे मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ फारच खास असणार आहे. हे संक्रमण चतुर्थ स्थानी असणार आहे. या काळात कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येऊ शकतात. नवीन लोकांशी भेटीगाठी होतील. तसेच, तुम्ही नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करु शकता. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल.
हेही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)















