Trigrahi Yog 2025 : नवीन वर्षाची सुरुवात व्हायला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. अशातच नवीन वर्षात अनेक शुभ योग आणि राजयोग निर्माण होणार आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला शक्तिशाली त्रिग्रही योग (Trigrahi Yog) जुळून येणार आहे. हा योग ग्रहांचा राजा सूर्य, धनदाता शुक्र आणि व्यवहाराचा कारक दाता बुध ग्रहाबरोबर जुळून येणार आहे. यामुळे काही राशींचे चांगले दिवस लवकरच सुरु होणार आहेत. त्याचबरोबर या राशींना चांगल्या पगाराच्या नोकरीबरोबर धनलाभही होण्याची शक्यता आहे. या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

धनु रास (Saggitarius Horoscope)

त्रिग्रही योग धनु राशीसाठी फार सकारात्मक ठरणार आहे. कारण हा योग या राशीच्या दुसऱ्या चरणात असणार आहे. त्यामुळे तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, बुद्धिमत्तेने तुम्ही व्यवहार कराल. या दरम्यान तुमची आर्थिक स्थिती देखील चांगली असेल. आत्मविश्वासात वाढ होईल. आणि समाजात तु्म्हाला मान-सन्मान मिळेल. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी त्रिग्रही योग फार शुभकारक ठरणार आहे. हा योग तुमच्या राशीच्या करिअर आणि व्यवसायावर परिणाम करणार आहे. त्यामुळे तुमच्या कामात चांगली प्रगती दिसून येईल. त्याचबरोबर जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली मदत मिळेल. नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची चांगली वेळ आहे. या कालावधीत तुम्ही हातात घेतलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. नव्या गोष्टींचा अनुभव घेता येईल.                  

Continues below advertisement

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी त्रिग्रही योग फार लाभदायक ठरु शकतो. या काळात ग्रहांच्या स्थितीचा शुभ परिणाम तुमच्यावर दिसून येईल. तसेच, देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा असल्या कारणाने तुम्हाला चांगला धनलाभही मिळेल. उत्पन्नाचे नवे मार्ग या काळात तुमच्यासाठी खुलतील. शेअर बाजारातही चांगला पैसा तुम्हाला मिळेल. गुंतवणुकीसाठी हा काळ तुमच्यासाठी फार योग्य असणार आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :              

Shani Margi 2025 : वर्षाच्या शेवटी शनि मार्गी होताच मालामाल होतील 'या' राशी; संकटांशी कराल दोन हात, तुमची रास यात आहे का? वाचा ज्योतिषशास्त्र