(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Time Travel: काय सांगता.. माणूस भूतकाळ, भविष्यात प्रवास करू शकणार? बाबा वेंगाच्या सर्वात मोठ्या भविष्यवाणीत नेमकं काय म्हटलंय?
Time Travel: माणूस काळाची बंधने तोडून भूतकाळ आणि भविष्यात प्रवास करू शकेल. पण खरंच हे शक्य आहे का? काय म्हटलंय बाबा वेंगांच्या भविष्यवाणीत? जाणून घ्या...
Time Travel: मंडळींनो... तुम्ही कधी 'टाईम ट्रॅव्हल' बद्दल ऐकलंय? आजकाल आपण अनेक चित्रपट किंवा पटकथांमधून याबद्दल ऐकतो. टाईम ट्रॅव्हल म्हणजे वर्तमानकाळातून भूतकाळ तसेच भविष्यकाळात प्रवास करणे. वाचून धक्का बसला? पण हे आता खरं होणार की काय अशी चर्चा आहे. कारण ज्या बाबा वेंगा हे त्यांच्या अचूक अंदाजांसाठी जगभरात ओळखल्या जातात. त्यांनी 9/11 चा हल्ला, सोव्हिएत युनियनचे विघटन आणि इतर मोठ्या घटनांसह अनेक आश्चर्यकारक आणि धक्कादायक घटनांचे भाकीत केले होते. जे खरे ठरले. बाबा वेंगांच्या भविष्यवाणीनुसार माणूस काळाची बंधने तोडून भूतकाळ आणि भविष्यात प्रवास करू शकेल. पण खरंच हे शक्य आहे का? माणूस भूतकाळ, भविष्यात प्रवास करू शकणार? काय म्हटलंय या भविष्यवाणीत? जाणून घ्या...
माणूस काळाची बंधने तोडून भूतकाळ, भविष्यात प्रवास करू शकेल?
आत्तापर्यंत तुम्ही चित्रपटांतून पाहिलेला 'टाईम ट्रॅव्हल' भविष्यात कधी आणि कसा घडेल, याचा विचार सध्या केला जातोय. 'टाईम ट्रॅव्हल'चे भाकित हे बाबा वेंगांच्या भविष्यवाण्यांमधील सर्वात रोमांचक आणि रहस्यमय विषयांपैकी एक आहे. टाइम ट्रॅव्हल हा विज्ञान आणि कल्पनाशक्तीचा अप्रतिम संगम आहे. चित्रपट, पुस्तके आणि विज्ञानामध्ये टाइम ट्रॅव्हलची चर्चा नेहमीच केली जाते. बाबा वेंगा म्हणाले होते की, भविष्यात माणूस काळाची बंधने तोडून भूतकाळ आणि भविष्यात प्रवास करू शकेल.
बाबा वेंगांनी आपल्या भविष्यवाणीत काय म्हटलंय?
बाबा वेंगांच्या भविष्यवाणीनुसार, 2228 पर्यंत मानव वेळ प्रवासाचे तंत्रज्ञान विकसित करू शकतील. हे तंत्रज्ञान विज्ञानाची नवीन उंची गाठण्याचे संकेत देईल. टाईम ट्रॅव्हलचा उपयोग केवळ मानवी जीवन सुधारण्यासाठी होणार नाही, तर भूतकाळ आणि भविष्य समजून घेण्यासही मदत होईल, असे ते म्हणाले. अनेक दिवसांपासून शास्त्रज्ञ यावर काम करत आहेत. आइन्स्टाईनचा सिद्धांत आणि ब्लॅक होल म्हणजेच कृष्णविवरांसारखे रहस्यमय घटक या दिशेने महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. सध्याच्या काळात प्रवास ही केवळ काल्पनिक गोष्ट असली तरी, ती प्रत्यक्षात आणण्यासाठी शास्त्रज्ञ सातत्याने प्रयत्न करत आहेत.
'टाईम ट्रॅव्हल'चे फायदे आणि आव्हाने माहितीयत?
'शास्त्रज्ञ सांगतात, टाईम ट्रॅव्हल' मानवतेला अनेक फायदे आणू शकतो. भूतकाळातील घटना अधिक चांगल्या पद्धतीने समजतील. भविष्यातील संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जाऊ शकतात. विज्ञान आणि वैद्यक क्षेत्रात आश्चर्यकारक शोध लावले जाऊ शकतात. मात्र यासह आव्हाने देखील असतील. 'टाईम ट्रॅव्हल' इतिहासाशी छेडछाड करू शकतो किंवा भविष्यात नको त्या समस्या निर्माण करू शकतो.
2228 मध्ये बाबा वेंगाचे स्वप्न पूर्ण होईल का?
बाबा वेंगाच्या भाकितानुसार, मानव 2228 मध्ये 'टाईम ट्रॅव्हल'चे स्वप्न साकार करू शकतो. हे तंत्रज्ञान मानवजातीसाठी एक क्रांतिकारक यश असेल. मात्र, हे तंत्रज्ञान कसे विकसित होणार आणि ते सुरक्षितपणे कसे राबविले जाणार हा मोठा प्रश्न आहे. बाबा वेंगाचे हे भाकीत माणसाची उत्सुकता आणखी वाढवते. टाईम ट्रॅव्हलचे स्वप्न साकार करणे हा विज्ञान क्षेत्रात मैलाचा दगड ठरेल. यासाठी आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानातील आश्चर्यकारक प्रगतीची आवश्यकता असेल. 2228 पर्यंत आपण हे स्वप्न प्रत्यक्षात आणू शकू का? हे फक्त वेळच सांगेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
,