Taurus Monthly Horoscope July 2023 : वृषभ राशीच्या लोकांसाठी जुलै 2023 महिना चांगला जाणार आहे. कोणतीही नवीन व्यवसाय कल्पना तुमच्यासाठी चांगली ठरणार आहे. कौटुंबिक जीवनात कुटुंबीयांबरोबर आनंदात वेळ घालवू शकाल. छोट्या कौटुंबिक सहलीला जाण्याचा देखील योग आहे. शिक्षण, प्रवास, आरोग्य, प्रेम आणि कुटुंबाच्या बाबतीत वृषभ राशीच्या लोकांसाठी जुलै महिना कसा असेल ते जाणून घेऊयात. 


या महिन्यात तुम्हाला आरोग्याची देखील विशेष काळजी घ्यावी लागेल. हलगर्जीपणा केल्यास महागात पडू शकतं. विद्यार्थ्यांना शिक्षणाशी संबंधित काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नोकरदार वर्गाला नोकरीत चांगली संधी मिळू शकते. तुमची पगारवाढ आणि बदलीही होऊ शकते. 


ग्रहांचे वृषभ राशी परिवर्तन


वृषभ राशीच्या ग्रहांच्या हालचालीनुसार, 8 ते 24 जुलै दरम्यान, सप्तम घरात बुधचा नववा-पंचम राजयोग असेल, ज्यामुळे जुलै महिन्यात तुम्ही कोणताही नवीन व्यवसाय सुरु करण्याची योजना आखू शकता. मार्केटिंग क्षेत्रात नफा मिळण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची पावलं उचलावी लागू शकतात. 17 ते 24 जुलै या कालावधीत बुध-सूर्य तृतीय घरात संयोग होणार असल्याने तुम्हाला नवीन स्टार्टअपसाठी गुंतवणुकीत चांगला नफा मिळणार नाही.  


वृषभ राशीचे करिअर कसे असेल?


16 जुलैपर्यंत दशम घरातून सूर्याचा नववा-पंचम राजयोग असेल, त्यामुळे या महिन्यात तुम्ही चांगले कार्य हाती घेऊ शकता. 17 जुलैपासून दशम घरातून सूर्याचा षडाष्टक दोष राहील, त्यामुळे बेरोजगार व्यक्तींना नोकरीच्या संधीसाठी फार मेहनत घ्यावी लागेल.  नोकरदार वर्गाने मात्र, आहे त्या ठिकाणी नोकरीला चिकटून राहणे फायदेशीर ठरेल.  


वृषभ राशीचे वैवाहिक आणि प्रेम संबंध कसे असतील?


6 जुलैपर्यंत शुक्राच्या सातव्या घरातून नववा-पंचम राजयोग असेल, त्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन चांगले असेल. तुम्ही कुटुंबीयांबरोबर आनंदात वेळ घालवू शकता. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कौटुंबिक नात्यातील कलह संपुष्टात येण्याची अपेक्षा आहे. धार्मिक स्थळालाही भेट देण्याचा योग आहे. यामुळे तुमच्याही मनाला शांती मिळेल.


विद्यार्थ्यांसाठी जुलै महिना कसा असेल? 


या महिन्यात विदयार्थ्यांना शिक्षणाशी संबंधित काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. अभ्यासाचा ताण जास्त असल्या कारणाने विद्यार्थ्यांना तणावाचा देखील सामना करावा लागू शकतो.  


वृषभ राशीच्या लोकांची आरोग्य स्थिती


आठव्या घरात राहुच्या नवव्या दृष्टीमुळे तुम्ही छोट्या कौटुंबिक सहलीला जाऊ शकता, पण अपघात होण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगा. 25, 26, 27 जुलै रोजी सहाव्या भावात चंद्र-केतूचे ग्रहण दोष असेल, त्यामुळे तणाव वाढल्याने तुम्हाला नैराश्याची तक्रार जाणवू शकते. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या : 


Monthly Horoscope July 2023 : जुलै महिना 'या' राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक! 5 महत्त्वाच्या ग्रहांचे परिवर्तन, मासिक राशीभविष्य जाणून घ्या