Taurus Horoscope Today 29 April 2023 : वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. तुम्ही दिलेली कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. वरिष्ठांकडूनही तुम्हाला सहकार्य मिळेल. बौद्धिक कार्यातून उत्पन्न वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. तुमचं जर कोणावर प्रेम असेल तर आज तुमच्या मनातील भावना व्यक्त करा. तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. जे बेरोजगार आहेत, त्यांना नवीन रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. आज तुमची एका बालपणीच्या मित्राशी भेट होऊ शकते. यामुळे तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. तुम्ही तुमचे सुख-दु:ख मित्रासोबत शेअर करा. व्यवसाय (Business) करणारे लोक व्यवसायातील त्यांच्या रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करतील. तुमची सर्व कामे पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. विद्यार्थी एका शहरातून दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी जाऊ शकतात. जे घरबसल्या ऑनलाईन काम करतात, त्यांनी काळजी घ्यावी.

Continues below advertisement

कौटुंबिक संसारात सुख-शांती लाभेल

तुम्ही तुमचे कुटुंब आणि जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. घराचा खर्चही भागेल. यामुळे तुमच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो, पण तुम्ही आनंदीही व्हाल. कुटुंबातील सदस्यांचे स्नेह आणि प्रेम बघायला मिळेल. आजचा दिवस कामाच्या संदर्भात व्यस्त असेल, परंतु तुम्हाला तुमच्या मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील. तुम्ही तुमच्या मेहनतीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. व्यापारी वर्गाला त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. विवाहित लोक आपल्या कौटुंबिक संसारात सुखी आणि समाधानी दिसतील. आज घरात शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. त्यामुळे संध्याकाळची वेळ उत्तम आहे.

वृषभ राशीचे आजचे आरोग्य 

वृषभ राशीच्या लोकांना आज कामामुळे मानसिक तणाव असू शकतो. मन शांत ठेवा. काही लोकांना घसा आणि स्नायूंशी संबंधित समस्या देखील असू शकतात.

Continues below advertisement

वृषभ राशीसाठी आजचे उपाय 

सकाळी उठून शुभ्र वस्त्रे परिधान करून लक्ष्मी देवीची पूजा करून पठण करून कमळाचे फूल अर्पण करावे.

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग 

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, वृषभ राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 29 April 2023 : आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा! कसा असेल तुमचा शनिवार? आजचे राशीभविष्य जाणून घ्या