Taurus Horoscope Today 2 May 2023 : वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. जे लोक लघुउद्योग करतात त्यांना त्यांच्या जवळच्या व्यक्तीकडून मदत मिळू शकते, ज्यामुळे त्यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचा मोकळा वेळ पूर्णपणे अनुभवण्यासाठी तुम्ही लोकांपासून दूर राहून तुमचे आवडते काम करा, असे केल्याने तुमच्यातही सकारात्मक बदल होतील, ज्यामुळे तुम्हाला पुढे जाण्यात खूप मदत होईल. संध्याकाळी तुमचे घर पाहुण्यांनी भरलेले असेल. उच्च शिक्षणासाठी (Education) काळ चांगला आहे. वैवाहिक जीवनात (Married Life) सुख-शांती राहील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुटुंबाच्या भल्यासाठी काम करताना दिसाल. राजकारणात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी सध्याचा काळ योग्य नाही.


तब्येतीच्या तक्रारी जाणवतील


आजचा दिवस वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांनी संयम राखण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी केलेली चि़डचिड तुमच्या प्रगतीत अडथळा निर्माण करू शकते. त्यामुळे संयमाने घ्या. तुमच्या कामातून तुमच्या इतर सहकाऱ्यांना उत्तर द्या. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. बदलत्या हवामानामुळे तब्येतीत चढ-उतार दिसून येतील अशा वेळी लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या. 


नोकरदार लोकांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. बॅचलर्सच्या लग्नाची चर्चा होऊ शकते. तुमच्या मनःशांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांना आज अधिक काम करण्याची संधी मिळेल. सामाजिक कार्यकर्त्यांकडूनही सन्मान मिळेल. आज तुमचे वैवाहिक जीवन खूप चांगले जाणार आहे. पती-पत्नीच्या नात्यात अधिक गोडवा येईल. भावनिक पातळीवर परस्पर संबंधात जवळीक वाढलेली दिसून येईल.


वृषभ राशीचे आजचे आरोग्य 


आज सर्दी किंवा इतर कारणामुळे छातीत दुखू शकते. हृदयरोग्यांना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे औषध आणि आहाराच्या बाबतीत गाफील राहू नका.


वृषभ राशीसाठी आजचे उपाय 


हनुमान चालिसाचे पठण करा. संध्याकाळी ईशान्येला गायीच्या तुपाचा दिवा लावावा.


वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग 


वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, वृषभ राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या : 


Horoscope Today 2 May 2023 : मेष, कन्या, कुंभ राशीच्या लोकांनी 'या' गोष्टींपासून सावध राहा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य