Taurus Horoscope Today 13 May 2023 : वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. विवाहित लोक आपल्या कौटुंबिक(Family) जीवनात आनंदी दिसतील. आज नोकरीत (Job) बढतीचा दिवस आहे. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. आज तुमचे थांबलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. आरोग्याची (Health) काळजी घ्या. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही बदल केले तर बरे होईल. कला आणि संगीतात रुची असू शकते. कुटुंबातील सदस्यांच्या गरजा लक्षात ठेवा. खर्च जास्त राहील, पण रोजचे उत्पन्न चांगले राहील. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठांचे चरणस्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घ्या, तुमची सर्व कामे पूर्ण होतील. घरात नवीन पाहुण्यांचे आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश होतील.
ताऱ्यांची हालचाल सांगत आहे की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस यशस्वी ठरेल. आज तुमचे पैसे खर्च होण्याची शक्यताही निर्माण होत आहे. आज तुम्ही घरगुती वस्तूंच्या खरेदीवर खूप पैसा खर्च करू शकता. तसेच, आज तुम्हाला जमीन मालमत्तेशी संबंधित कोणत्याही व्यवहारात नफा मिळू शकतो. नोकरदार वर्गातील कर्मचारी त्यांच्या कामात खूप व्यस्त असणार आहेत. आज तुम्ही सामाजिकदृष्ट्या खूप सक्रिय राहाल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. मित्रांचेदेखील आज तुम्हाला सहकार्य मिळू शकते.
वृषभ राशीचे आजचे कौटुंबिक जीवन
कुटुंबात समृद्धी राहील. सर्व सदस्य कामात एकमेकांना पूर्ण सहकार्य करतील. तथापि, संध्याकाळी कुटुंबातील सदस्यांमध्ये एखाद्या गोष्टीवरून वादविवाद होऊ शकतो.
वृषभ राशीसाठी आजचे आरोग्य
आज तुम्हाला शारीरिक थकवा जाणवेल. इतर कोणतीही समस्या राहणार नाही. जास्त व्यायाम केल्याने श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी प्राणायाम फायदेशीर ठरेल.
वृषभ राशीसाठी आजचे उपाय
उगवत्या सूर्याला जल अर्पण करा आणि गायत्री मंत्राचा 11 वेळा जप करा. आज इतरांशी वाद घालणे टाळा.
वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग
वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, वृषभ राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :