Swami Samartha : कामात येणारा अडथळा दूर होईल...तुमची चांगली वेळ येण्याआधी स्वामी देतात 'हे' 6 संकेत
Swami Samartha : आपण अशाच काही शुभ संकेतांविषयी जाणून घेऊयात जे आपल्याला स्वमींच्या मार्फत रोजच्या जीवनात अनुभवायला मिळतात. आपली चांगली वेळ येण्यापूर्वी आपल्याला कोणते संकेत मिळतात हे जाणून घेऊयात.

Swami Samartha : अनेकदा आपल्या आयुष्यात काही गोष्टी अचानक घडतात. काही गोष्टींचा आपल्याला संदर्भही लागत नाही किंवा त्या तशा घडण्यामागे आपला फारसा वाटाही नसतो. अशा वेळी आपल्याला काही गोष्टींचे संकेत मिळतात. हे संकेत म्हणजेच तुमची चांगली वेळ येण्याचा स्वामींनी (Swami Samartha) दिलेला इशारा. आज आपण अशाच काही शुभ संकेतांविषयी जाणून घेऊयात जे आपल्याला स्वमींच्या मार्फत रोजच्या जीवनात पाहायला, अनुभवायला मिळतात. तर, आपली चांगली वेळ येण्यापूर्वी आपल्याला कोणते संकेत मिळतात हे जाणून घेऊयात.
तुमची चांगली वेळ येण्यापूर्वी मिळतात 'हे' संकेत
मन:शांती मिळणे - (Finding Peace of Mind)
जर तुमचं अनेक दिवसांच्या तणावानंतर अचानक मन शांत होऊ लागलं. किंवा त्रासदायक विचार कमी होऊ लागले. तर, समजा स्वामी तुमच्या पाठीशी आहेत.
मार्गातील अडथळे दूर होणे - (Removing obstacles in the way)
अनेक दिवासांपासून तुमच्या कामाच्या बाबतीत अनेक लोकांचे प्रश्न उपस्थित होतायत. अशा वेळी कामातील अडथळे जर अचानक दूर होत असतील. आणि तुमच्यात आशेचा किरण जागत असेल तर स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे.
स्वप्न संकेत - (Dreams)
जर तुम्हाला स्वप्नात स्वामींचे दर्शन झाले. किंवा स्वप्नात मंदिर तसेच दिपज्योत दिसणं हा एक प्रकारचा शुभ संकेत मानला जातो.
अकस्मात मदत मिळणे - (Getting help suddenly)
अनेकदा आपल्या कठीण परिस्थितीत आपल्याला अचानक योग्य व्यक्ती भेटते. त्या व्यक्तीच्या मार्फत आपल्याला योग्य मार्ग मिळतो. अशा वेळी हा शुभ संकेत धरुन चाला.
सकारात्मक ऊर्जा जाणवणे - (Feel the Positive Energy)
घरात, कामात किंवा मनात प्रसन्न वातावरण निर्माण होत असेल. तर हा तुमच्यासाठी एक चांगला संकेत आहे.
सतत स्वामींची आठवण येणे - (Constantly remembering the Swami Samartha)
अनाहतपणे स्वामींचे नाव जपले जाणे. मन भक्तीत ओढले जाणे हा देखील स्वामींनीच दिलेला शुभ संकेत आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :















