Surya-Shani Yuti 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्राच्या परिवर्तन किंवा संक्रमणाचं विशेष महत्त्व सांगण्यात आलं आहे. सौरमालेतील प्रत्येक ग्रह, नक्षत्र एका ठराविक काळासाठी राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करतात. ग्रह-नक्षत्रांचा व्यक्तीच्या जीवनावर देखील शुभ-अशुभ परिणाम होतो. 


ज्योतिष शास्त्रानुसार, 12 फेब्रुवारी रोजी ग्रहांचा राजा सूर्य मकर राशीतून कुंभ राशीत विराजमान होणार आहे. या राशीत आधीपासूनच शनी विराजमान आहे. त्यामुळे कुंभ राशीत सूर्य आणि शनीची युती होणार आहे. या युती योगाने तीन राशींच्या लोकांना विशेष लाभ मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 


मेष रास (Aries Horoscope)


सूर्य-शनीच्या संक्रमणामुळे मेष राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. या राशीच्या लोकांची नोकरी-व्यवसायात चांगली प्रगती पाहायला मिळेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी व्हाल. तसेच, सामाजिक कार्यात तुमची रुची वाढेल. नोकरीत पदोन्नती होईल. मित्रांच्या सहकार्याने तुम्हाला अनेक गोष्टी सहज साध्य करता येतील. 


सिंह रास (Leo Horoscope)


सूर्य-शनीच्या युतीने सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ लाभदायक असेल. नोकरदार वर्गातील लोकांचं कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. तसेच, तुमची मानसिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. या काळात तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करु शकता. वैवाहिक लोकांच्या नात्यात अधिक गोडवा वाढेल. तसेच, या काळात तुमचं आरोग्यही चांगलं राहील. यासाठी नियमित योगासन आणि व्यायाम करा. 


कुंभ रास (Aquarius Horoscope)


सूर्य-शनीचा जुळून येणारा योग कुंभ राशीच्या लोकांसाठी फार शुभकारक ठरेल. या राशीशी संबंधित नोकरदार वर्गातील लोकांचं कामाच्या ठिकाणी कौतुक केलं जाईल. तसेच, तुम्हाला प्रमोशन देखील मिळू शकतं. एखाद्या मोठ्या संकटातून तुमची सुटका होईल. मुलांकडून शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. या काळात तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील, 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:                                                                   


Mauni Amavasya 2025 : मौनी अमावस्येला 'या' 4 शुभ मुहूर्तात करा स्नान-दान; सर्व पापांपासून मिळेल मुक्ती, मिळणार दुप्पट लाभ