Surya Nakshatra Parivartan 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, मार्च महिना (March 2026) सुरु झाला आहे. या महिन्यात ग्रहांचा राजा सूर्याचं (Sun) एक, दोनदा नाही तर तीन वेळा नक्षत्र परिवर्तन होणार आहे. ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने हा काळ फार खास मानला जातो. सूर्य ग्रह सर्वात आधी आज म्हणजेच 5 मार्च रोजी रात्री 1 वाजता सूर्य पूर्वाभाद्रपद नक्षत्रा प्रवेश केला आहे. त्यानंतर 18 मार्च रोजी सकाळी 9 वाजून 27 मिनिटांनी उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. महिन्याच्या शेवटी म्हणजेच, 31 मार्च रोजी संध्याकाळी 8 वाजून 16 मिनिटांनी सूर्य रेवती नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
मार्च महिन्यात सूर्याच्या बदलणाऱ्या या नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव अनेक राशींवर पडणार आहे. या राशींच्या करिअर, लीडरशिप क्वालिटी तसेच, व्यवसायावर परिणाम दिसून येणार आहे. तर, सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाचा कोणकोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांचा या काळात आत्मविश्वास वाढलेला दिसून येईल. करिअरच्या बाबतीत तुमची रखडलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. तसेच, कामाच्या ठिकाणी उच्च अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येऊ शकतात. तसेच, नात्यात सामंजस्य वाढेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी हा काळ एकजुटीने पुढे जाण्याचा आहे. या काळात तुमच्यातील नेटवर्किंग चांगलं असणार आहे. तसेच, नोकरीत तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं. एखादी मोठी संधी तुमच्यासमोर चालून येईल. तसेच, उत्पन्नाच्या नवीन संधी तुमच्यासमोर निर्माण होतील.
सिंह रास (Leo Horoscope)
या राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. त्यामुळे नक्षत्र परिवर्तनाचा हा काळ फार खास असणार आहे. या काळात तुमच्यातील नेतृत्वक्षमता दिसून येईल. प्रॉपर्टीच्या संदर्भात तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. तसेच, समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये संतुलन पाहायला मिळेल. तसेच, व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तुम्ही पार्टनरशिपमध्ये नवीन कार्याची सुरुवात करु शकता.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांना या काळात नशिबाची चांगली साथ मिळेल. मुलांचं अभ्यासात मन रमेल. तसेच, घरात लवकरच शुभकार्य घडण्याची शक्यता आहे. वडिलधाऱ्या लोकांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांना या काळात मेहनतीचं चांगलं फळ मिळेल. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
