Surya Nakshatra Parivartan 2025 : वैदिक पंचांगानुसार, 25 मे 2025 रोजी सूर्य (Surya) ग्रह आपल्या मित्र ग्रहात म्हणजेच चंद्राच्या रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. सूर्याच्या या परिवर्तनाचा सर्व 12 राशींवर परिणाम होणार आहे. मात्र, या काळात 3 राशींच्या लोकांना सतर्क राहण्याची गरज आहे. या राशींच्या लोकांना करिअर, आरोग्य आणि कौटुंबिक जीवनात अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
सूर्याचं नक्षत्र परिवर्तन मिथुन राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरणार नाही. कारण सूर्य ज्या नक्षत्रात प्रवेश करणार आहे त्याचा शत्रू ग्रह बुध आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच, या काळात विशेषत: तुमच्या खर्चावर लक्ष ठेवा. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला मेहनतीचा सामना करावा लागू शकतो. तसेच, तुम्हाला मानसिक तणाव जाणवेल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी सूर्याचं हे नक्षत्र परिवर्तन फार आव्हानात्मक असणार आहे. या दरम्यान तुमच्या आरोग्यात अनेक बदलाव तुम्हाला जाणवतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या मनासारखं काम होणार नाही. तसेच, ग्रहांचा अशुभ प्रभाव तुमच्यावर असल्या कारणाने या काळात कोणतेच महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होऊ शकतो. या काळात तुम्हाला मित्र-मैत्रीणींची साथ देखील कठीण आहे. त्यामुळे कोणावरच विश्वास ठेवू नका.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी देखील हा काळ फार आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. तसेच, तुमची तब्येत बिघडू शकते. या कालावधीत कोणालाच पैसे दान करु नका. तसेच, वातावरणातील बदलांचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोणतेच बाहेरचे पदार्थ खाऊ नका. आरोग्याची काळजी घ्या. आणि सकस आहाराचं सेवन करा. तसेच, नियमित योग आणि ध्यान करा.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
