Surya Nakshatra Parivartan 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्यदेवाला (Sun) ग्रहांचा राजा म्हणतात. सूर्य देव शक्ती, आत्मविश्वास, नेतृत्व आणि अहंकाराचा कारक ग्रह मानला जातो. आज म्हणजेच 19 नोव्हेंबर (November) 2025 रोजी सूर्याचं नक्षत्र परिवर्तन झालं आहे. सूर्याने विशाखा नक्षत्रातून आपल्या पुत्राच्या म्हणजेच शनिच्या अनुराधा नक्षत्रात प्रवेश केला आहे. डिसेंबरपर्यंत सूर्य या नक्षत्रात संक्रमण करणार आहे. आपल्या सर्वांनाच माहित आहे शनिदेवाला शिस्त, कर्म, संघर्ष आणि व्यवहाराचा कारक ग्रह मानला जातो.
सूर्य देवाचे शनिच्या नक्षत्रात प्रवेश करुन दोन विभन्न स्वभावाच्या व्यक्ती जवळ येतात. ज्योतिष शास्त्रात म्हटल्याप्रमाणे, जेव्हा दोन ऊर्जा एकाच नक्षत्रात सक्रिय होतात तेव्हा जीवनात चांगले बदल घडून येतात. या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. सूर्यदेवाच्या नक्षत्र परिवर्तनाने सर्व राशींवर याचा शुभ परिणाम होणार आहे. मात्र, तीन राशींच्या धनसंपत्तीत चांगली वाढ होणार आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
सूर्याने अनुराधा नक्षत्रात प्रवेश केल्याने मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ फार शुभकारक ठरणार आहे. मिथुन राशीच्या लोकांना नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये तुम्ही एखाद्या नवीन प्रोजेक्टवर काम सुरु करु शकता. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळेल. तुमची अनेक कामे लवकर पूर्ण होतील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
सूर्याने अनुराधा नक्षत्रात प्रवेश केल्याने मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ फार शुभकारक ठरु शकतो. या काळात नोकरदार वर्गातील लोकांना करिअरमध्ये चांगलं यश मिळेल. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. तसेच, नवीन सरकारी योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकाल. मित्रांच्या सहकार्याने तुम्हाला तुमची अनेक कामे पूर्ण करता येतील.
सिंह रास (Leo Horoscope)
सूर्याचं अनुराधा नक्षत्रात प्रवेश करणं सिंह राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. या काळात कामाच्या ठिकाणी तुमच्यावर काही नवीन जबबादाऱ्या सोपवण्यात येऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. तसेच, पती-पत्नीच्या नात्यात जे अनेक दिवसांपासून वाद-विवाद सुरु होते ते हळुहळू दूर होताना दिसतील.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)