Surya Mangal Yuti 2025 : वैदिक शास्त्रानुसार, यंदा दिवाळीचा (Diwali 2025) सण 20 ऑक्टोबर 2025 रोजी सोमवारी साजरा केला जाणार आहे. हिंदू पंचांगानुसार, दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला दिवाळीचा सण साजरा केला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार, दिवाळीच्या आधी सूर्याचं परिवर्तन होणार आहे. यामुळे मंगळकारी आदित्य मंगळ राजयोग (Rajyog) निर्माण होणार आहे. 17 ऑक्टोबर रोजी सूर्य कन्या राशीतून निघून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी मंगळ देव आधीपासूनच विराजमान आहे. यामुळे सूर्य-मंगळ युती निर्माण होणार आहे. 

Continues below advertisement

माहितीनुसार, वैदिक ज्योतिष शास्त्रात सूर्य आणि मंगळ दोन्ही ग्रह अग्नि तत्त्वाचे आहेत. जेव्हा या दोन्ही ग्रहांची युती होते तेव्हा त्याचा सकारात्मक प्रभाव सर्व राशींवर होतो. सूर्य मंगळ ग्रहाची युती अनेक राशींसाठी लकी ठरणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी सूर्य मंगळ ग्रहाची युती फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तसेच, तुमच्या करिअरमध्ये नवीन संधी निर्माण होतील. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढू शकतो. तुमच्या कुटुंबातून तुम्हाला शुभवार्ता ऐकायला मिळेल. 

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी ही युती फार प्रभावकारक ठरणार आहे. या काळात नोकरीत तुम्हाला उच्च अधिकाऱ्याचा  चांगला सपोर्ट मिळेल. बिझनेसमध्ये तुम्ही नवीन गुंतवणूक करु शकता. त्यातून तुम्हाला लाभ मिळेल. तसेच, सामाजिक क्षेत्रात तुमचा चांगला विकास होईल. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी ही युती फार लाभदायक ठरणार आहे. तुमच्या करिअरमद्ये तुमची प्रगती दिसून येईल. तसेच, तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तसेच, तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तुमच्या कलागुणांना चांगला वाव देता येईल.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी ही युती फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत भरभराट झालेली दिसेल. तसेच, नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. तुमच्या प्रमोशनमध्ये चांगली वाढ झालेली दिसेल. नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची तुम्हाला संधी मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :     

Kuldeepak Rajyog 2025 : अवघ्या 24 तासांत मंगळ ग्रहाचा पॉवरफुल राजयोग; 28 सप्टेंबरपासून 'या' 3 राशींचा गोल्डन टाईम सुरु, पैसा होणार दुप्पट