Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, तब्बल 12 वर्षांनंतर मेष राशीत सूर्य आणि गुरु बृहस्पति यांचा संयोग होणार आहे. 14 एप्रिल 2023 रोजी सूर्य मेष राशीत प्रवेश करेल. तर, 22 एप्रिल 2023 रोजी गुरु बृहस्पति देखील मेष राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि गुरु हे दोन्ही ग्रह खूप प्रभावशाली मानले जातात. या दोन ग्रहांचे एकत्र येणे खूप शुभ मानले जाते. सूर्य आणि गुरूच्या या संयोगामुळे काही राशींचे भाग्य खुलणार आहे. जाणून घ्या या भाग्यवान राशींबद्दल.
मेष
या राशीच्या लोकांसाठी गुरू आणि सूर्याचा योग खूप खास असणार आहे. या राशीच्या लोकांसाठी ही युती शुभ आणि फलदायी असेल, कारण ही युती तुमच्याच राशीत होणार आहे. त्याच्या प्रभावाने, तुमचे सर्व कार्य यशस्वी होतील. नोकरीच्या ठिकाणी प्रगती होईल. यावेळी सुरू केलेला नवीन व्यवसाय फायदेशीर ठरेल.
मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल
गुरु आणि सूर्याच्या संयोगामुळे मेष राशीच्या लोकांची आर्थिक बाजूही पूर्वीपेक्षा मजबूत होईल. तुमच्या जोडीदारासोबत तुमचा समन्वय पूर्वीपेक्षा चांगला राहील. यावेळी, तुम्हाला कुठूनतरी अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. तुमचे नशीब उजळणार आहे आणि सामाजिक कार्यात तुमच्या रुचीचा तुम्हाला फायदा होईल. या युतीमध्ये तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांना गुरु आणि सूर्य यांच्या संयोगाने विशेष लाभ होणार आहे. ज्यांना नवीन व्यवसायात भागीदारी करायची आहे त्यांच्यासाठी हा काळ खूप चांगला जाणार आहे. तुम्हाला अनेक नवीन संधी मिळतील. यावेळी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नवीन उंची प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळण्याची शक्यता आहे.
नवीन संधी मिळतील
या संयोगाने मिथुन राशीच्या लोकांसाठी अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या संयोगाने तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. या राशीच्या बेरोजगारांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. जे आधीच नोकरी करत आहेत, त्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते.
तूळ
सूर्य-गुरूच्या युतीमुळे तूळ राशीच्या लोकांसाठी फायदाच होणार आहे. तूळ राशीच्या लोकांना या संयोगाने आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात यश मिळेल. मात्र, यावेळी तुमचे खर्च थोडे वाढू शकतात, त्यामुळे बचतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. तुमची उत्पन्नाची स्थिती चांगली राहील.
वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील
तूळ राशीच्या लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात सूर्य आणि गुरूच्या संयोगाचे फायदे बघायला मिळतील. ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत होते, त्यांच्या प्रभावामुळे त्यांचे अडथळे दूर होतील आणि विवाह शुभ राहील. कौटुंबिक जीवन देखील पूर्वीपेक्षा चांगले होईल. भागीदारीत काम करून चांगला नफा मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या
Valentine Day 2023 Horoscope : या 6 राशींसाठी व्हॅलेंटाईन डे खास, मिळेल खरे प्रेम! ज्योतिषशास्त्रात काय म्हटलंय?