Surya Grahan 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, आज म्हणजेच 17 फेब्रुवारी 2026 रोजी वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण (Surya Grahan 2026) लागणार आहे. हे सूर्यग्रहण कुंभ राशीत तसेच, धनिष्ठा नक्षत्रात लागणार आहे. या सूर्यग्रहणाची वेळ दुपारी 03 वाजून 17 मिनिटांनी सुरु होईल ते संध्याकाळी 7 वाजून 56 मिनिटांपर्यंत हे सूर्यग्रहण असणार आहे. 

ज्योतिष शास्त्रानुसार, या सूर्यग्रहणाचा सर्व राशींवर थोडाफार परिणाम दिसून येणारच आहे. मात्र, कुंभ राशीच्या लोकांवर सर्वाधिक परिणाम दिसून येईल. या राशीला तब्बल एक महिन्यापर्यंत सतर्क राहावं लागणार आहे. त्यामुळे तुमच्या वैयक्तिक जीवनावर याचा कसा परिणाम दिसून येईल हे जाणून घेऊयात. 

वैयक्तिक जीवन (Professional Life)

सूर्यग्रहणाच्या परिणामामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी अचानक स्थिती बदलू शकते. वरिष्ठांशी तुमचे मतभेद होऊ शकतात. तसेच, तुमच्यावर कामाच्या अतिरिक्त जबाबदाऱ्या येऊ शकतात. नवीन योजनांचा लाभ घ्याल मात्र त्यातही तुम्हाला सावधानता बाळगण्याची गरज आहे. 

आर्थिक स्थिती (Economic)

आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमच्या कामामध्ये तुम्हाला अनिश्चितता दिसून येईल. खर्चात अचानक वाढ होण्याची शक्यता आहे.तसेच, गुंतवणूक करताना घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका. अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. ग्रहण काळाच्या दरम्यान कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. 

कौटुंबिक जीवन (Famiy)

ग्रहणकाळाचा तुमच्या कौटुंबिक जीवनावरही परिणाम दिसून येईणार आहे. या कालावधीत तुमच्या नात्यातील गैरसमज वाढू शकतात. संवादाचा अभाव दिसून येईल. तसेच, तुम्हाला तुमच्या रागावर देखील नियंत्रण ठेवणं  गरजेचं आहे. अन्यथा तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. 

आरोग्य (Health)

आरोग्याच्या बाबतीत कुंभ राशीसाठी हा काळ अनुकूल नाही. या कालावधीत तुम्हाला थकवा तसेच, मानसिक तणाव जाणवू शकतो. झोपेच्या अभावामुळे तुमचं डोकं दुखू शकतं. त्यामुळे या कालावधीत योग आणि ध्यान करणं लाभदायी ठरेल. 

हे ही वाचा :                                                                 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Horoscope Today 17 February 2026 : आज माघ अमावस्येच्या दिवशी 7 राशींनी राहावं जपून, दिवसाच्या शेवटी घडणार आक्रित; पदोपदी राहा सावध, आजचे राशीभविष्य