Surya Grahan 2026: नुकतंच 2026 वर्षातील पहिलं सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण देखील पार पडलं. हिंदू धर्मात चंद्र आणि सूर्यग्रहण अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण 17 फेब्रुवारी रोजी झालं होतं, आता चर्चा आहे ती म्हणजे वर्षातल्या दुसऱ्या सूर्यग्रहणाची...अनेक जणांना या सूर्यग्रहणाची तारीख, वेळ आणि सूतक काळ बद्दल उत्सुकता आहे, वैदिक पंचांगानुसार. हे ग्रहण आषाढ अमावस्येच्या दिवशी होत आहे, ज्योतिषशास्त्रानुसारही या सूर्यग्रहणाचे मोठे महत्त्व आहे, याचा परिणाम 12 राशींवर होताना दिसणार आहे. कोणत्या राशी यामुळे भाग्यशाली ठरणार आहेत? कोणत्या राशींना सावधगिरी बाळगावी लागेल? तसेच हे सूर्यग्रहण भारतात दिसणार की नाही, याबद्दल जाणून घ्या...
2026 चे दुसरे सूर्यग्रहण केव्हा आहे? (Surya Grahan 2026)
2026 च्या सूर्यग्रहणाची तारीख - 12 ऑगस्ट 2026, बुधवारग्रहणाची वेळ - सूर्यग्रहण 12 ऑगस्ट रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 9:04 वाजता सुरू होईल आणि 13 ऑगस्ट रोजी पहाटे 4:25 वाजता संपेल.प्रकार - संपूर्ण सूर्यग्रहणहे ग्रहण सिंह राशीत होणार असल्यामुळे आत्मविश्वास, नेतृत्व आणि प्रतिष्ठेवर याचा प्रभाव दिसेल
12 ऑगस्ट 2026 सूर्यग्रहणाच्या भाग्यशाली राशी
सिंह (Leo)
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहण सिंह राशीतच होत आहेजीवनात मोठे बदल आणि नवीन ओळख निर्माण होईलकरिअरमध्ये प्रगती आणि आत्मविश्वास वाढेल
धनु (Sagittarius)
ज्योतिषशास्त्रानुसार, नशीब जोरात साथ देईलनवीन संधी, प्रवास किंवा मोठी प्रगती होण्याची शक्यताशिक्षण आणि करिअरमध्ये लाभ
मेष (Aries)
ज्योतिषशास्त्रानुसार, नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी उत्तम वेळकरिअर आणि सामाजिक क्षेत्रात यश मिळेल
वृश्चिक (Scorpio)
ज्योतिषशास्त्रानुसार, करिअरमध्ये मोठा बदल संभवतोपदोन्नती किंवा नवीन दिशा मिळू शकते
वृषभ (Taurus)
ज्योतिषशास्त्रानुसार, आर्थिक स्थैर्य वाढेलघर, जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित लाभ
कोणत्या राशींना सावध राहावे?
ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ, कर्क, मकर राशींना या काळात सावध राहण्याची आवश्यकताभावनिक निर्णय टाळाखर्च आणि नातेसंबंधांमध्ये काळजी घ्या
2026 वर्षातील दुसरे सूर्यग्रहण भारतात दिसेल का?
2026 चे दुसरे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. हे सूर्यग्रहण आइसलँड, ग्रीनलँड, आर्क्टिक, अटलांटिक महासागर आणि उत्तर स्पेन, फ्रान्स, युनायटेड किंगडम आणि इटलीमध्ये दिसेल.
सूतक काळ असणार का?
वैदिक पंचांगानुसार, हे सूर्यग्रहण आषाढ महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी होत आहे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे, तो सूतक काळ म्हणून पाळला जाणार नाही आणि कोणत्याही धार्मिक विधींमध्ये अडथळा आणणार नाही.
सूर्यग्रहणामागील वैज्ञानिक कारणे
सूर्यग्रहणाबाबत वैज्ञानिक कारण जाणून घ्यायचं असल्यास, जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो, तेव्हा सूर्यग्रहण होते. यामुळे काही क्षणांसाठी सूर्यप्रकाश रोखला जातो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. हे अमावस्येच्या दिवशी घडते. पृथ्वी स्वतःच्या अक्षावर किंचित कललेली असल्यामुळे, हे तीन बिंदू प्रत्येक अमावस्येच्या दिवशी एका रेषेत येत नाहीत, परंतु जेव्हा असे घडते, तेव्हा सूर्यग्रहण होते. सूर्यग्रहण पाहताना विशेष चष्मा वापरावा, कारण त्यामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते.
ही वाचा
Numerology: आयुष्यात अचानक श्रीमंतीचा योग! 'या' जन्मतारखा कुबेरदेवांच्या अत्यंत प्रिय, संपत्तीत वाढ होत जाते, फक्त 'ही' गोष्ट सांभाळा! अंकशास्त्र
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
