Surya Grahan 2026: सूर्यग्रहण...ही एक खगोलीय घटना जरी असली तरी हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रामध्ये याला विशेष महत्त्व आहे. हे वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण असेल. ज्योतिषशास्त्रानुसार, या सूर्यग्रहणाचा लोकांच्या जीवनावरही महत्त्वपूर्ण परिणाम होईल. कारण, हे सूर्यग्रहण कर्क राशीत होत असून ते तीन राशींसाठी अत्यंत शुभ असेल. या ग्रहणाचा 3 राशींवर सकारात्मक परिणाम होणार आहे. जाणून घ्या वर्षातील दुसरं सूर्यग्रहण कधी होणार? याचा सूतक काळ वैध असेल का? हे ग्रहण भारतात दिसणार का? त्या भाग्यशाली राशींबद्दल...
सूर्यग्रहण केव्हा होणार आहे? (Surya Grahan 2026)
पंचागानुसार, 2026 सालचे दुसरे सूर्यग्रहण 12 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे. हा दिवस आषाढ महिन्यातील अमावस्येचा आहे, ज्याला दीप अमावस्या असेही म्हणतात, ज्यामुळे हे ग्रहण अधिक विशेष ठरते. पंचागानुसार, हे सूर्यग्रहण 12 ऑगस्ट रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 9:04 वाजता सुरू होईल आणि 13 ऑगस्ट रोजी पहाटे 4:25 वाजता संपेल. म्हणजेच, हे ग्रहण अंदाजे साडेसहा तास टिकेल. हे या वर्षातील सर्वात मोठं सूर्यग्रहण असेल, कारण यापूर्वीचे 17 फेब्रुवारी 2026 रोजी झालेले सूर्यग्रहण अंदाजे साडेचार तास टिकले होते. या ग्रहणाचा लोकांच्या करिअर, आर्थिक परिस्थिती आणि प्रगतीवर महत्त्वपूर्ण परिणाम होईल. ज्योतिषशास्त्रानुसार हे ग्रहण कोणत्या राशींसाठी शुभ ठरेल, ते जाणून घ्या.
हे सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सूतक काळ?
पंचांगानुसार, 12 ऑगस्ट, 2026 रोजी होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे, सूतक काळ पाळला जाणार नाही.
सूर्यग्रहण 3 राशींसाठी अत्यंत शुभ...
ज्योतिषशास्त्रानुसार, 12 ऑगस्ट 2026 रोजी होणारे सूर्यग्रहण कर्क राशीत होत असून ते तीन राशींसाठी अत्यंत शुभ असेल. या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या की सूर्यग्रहणामुळे कोणत्या राशींना फायदा होईल.
मेष (Aries)
ज्योतिषशास्त्रानुसार, वर्षातील दुसरे सूर्यग्रहण मेष राशीसाठी खूप चांगले ठरू शकते. या लोकांना अचानक करिअरमध्ये एक मोठी संधी मिळू शकते. करिअरमधील प्रगतीसाठी हा काळ अनुकूल आहे.
सिंह (Leo)
ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीसाठी, हे सूर्यग्रहण जीवनात एका नवीन सुरुवातीचे प्रतीक ठरू शकते. व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात अनेक सकारात्मक बदल घडू शकतात. संपत्ती आणि समृद्धीसोबतच, आदर आणि आनंदही वाढेल.
तूळ (Libra)
ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ राशीसाठी सूर्यग्रहण भाग्यवान ठरू शकते. तुमच्या आर्थिक परिस्थितीत आणि वैयक्तिक जीवनात अचानक मोठे बदल घडू शकतात. तुम्ही सुखी आणि यशस्वी जीवन जगाल.
हेही वाचा
Weekly Horoscope: मे महिन्याचा शेवटचा आठवडा पॉवरफुल, 7 राशींचं नशीब पालटणार! ग्रहांचे अद्भूत राजयोग, भोलेनाथांचं पाठबळ, 12 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
