Surya Grahan 2026: आपण अनेकदा विचार करतो, दिवसरात्र मेहनत करून, काबाडकष्ट करून, सत्याने वागले तरी दारिद्र्य आणि दु:ख काही मिटत नाही. पण एकदा का तुमचे नशीब चमकले की मग तो व्यक्ती मागे वळून पाहत नाही, त्याची प्रगती होत जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, माणसाच्या चांगल्या आणि वाईट दिवसामागे ग्रहांची शुभ-अशुभ स्थितीसुद्धा कारणीभूत ठरते. पंचांगानुसार वर्षातील पहिले सूर्यग्रहण 17 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हे ग्रहण  राशींसाठी अत्यंत शुभ ठरेल. जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत?

Continues below advertisement

हे ग्रहण भारतात दिसणार का? सुतक काळ वैध राहणार का? (Surya Grahan 2026)

वैदिक पंचांगानुसार, वर्षातील पहिले सूर्यग्रहण फेब्रुवारीमध्ये फाल्गुन अमावस्येच्या दिवशी होणार आहे. हे ग्रहण कुंभ आणि धनिष्ठ नक्षत्रात होईल. 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:26 वाजता सुरू होऊन संध्याकाळी 7:57 वाजता संपेल. ही खगोलीय घटना दक्षिण आफ्रिका, दक्षिण अर्जेंटिना आणि अंटार्क्टिकाच्या काही भागात दिसेल. हे ग्रहण भारतात दिसत नसल्याने, त्याचा सुतक काळ येथे वैध राहणार नाही. काही राशींवर या ग्रहणाचा सकारात्मक परिणाम दिसून येतो.

मेष (Aries)

ज्योतिषशास्त्रानुसार, वर्षातील पहिले सूर्यग्रहण मेष राशीसाठी भाग्यशाली ठरेल. या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअर आणि कामात प्रगती करण्याची संधी मिळेल. त्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. पदोन्नतीची दाट शक्यता आहे. नोकरीत बदल होईल. व्यावसायिकांसाठी हा एक उत्तम काळ असणार आहे.

Continues below advertisement

मिथुन (Gemini)

ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण उत्तम राहील. करिअरमध्ये प्रगती लक्षणीय असेल. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होईल. व्यावसायिकांना विशेष फायदे मिळतील. नवीन योजना यशस्वी होऊ शकतात.

सिंह (Leo)

ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीच्या लोकांना त्यांची प्रतिष्ठा वाढताना दिसेल. नोकरीत बदल फायदेशीर ठरेल. पदोन्नती मिळण्याचीही दाट शक्यता आहे. एखादा मोठा व्यवसाय करार अंतिम होऊ शकतो. एकंदरीत, हा काळ उत्तम आहे.

तूळ (Libra)

ज्योतिषशास्त्रानुसार, तुळ राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली राहील. तुमचे प्रलंबित काम पूर्ण होईल. नवीन नोकरी मिळण्याचीही दाट शक्यता आहे. तुम्हाला वाहन किंवा घराचा आनंदही घेता येईल.

धनु (Sagittarius)

ज्योतिषशास्त्रानुसार, धनु राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण भाग्य बदलणारे ठरेल. ते विदेशातील व्यवहारांशी संबंधित बाबींमध्ये यशस्वी होतील. तुम्ही नवीन काम सुरू करू शकता. घर खरेदी करण्याचीही शक्यता आहे.

हेही वाचा

Shani Dev: टेन्शन संपलं, 2026 चे उरलेले 11 महिने 3 राशींचं राज्य! शनिदेवांकडून लाड, जीवनात मोठं पद, संपत्ती, आदर, सौभाग्य फळफळलं..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)