Surya Grahan 2026: नुकताच फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा फेब्रुवारी महिना खूप खास असणार आहे. या महिन्यात अनेकांचे नशीब पालटण्याची शक्यता आहे, कारण या महिन्यात ग्रहांचे फेरबदल पाहायला मिळणार आहेत. आधी महाशिवरात्रीचा सण आणि नंतर 2026 वर्षातले पहिले सूर्यग्रहण होत आहे, भारतीय प्रमाण वेळेनुसार (IST) आणि ज्योतिषशास्त्रानुसार हे ग्रहण कधी आणि कोणत्या वेळी होईल? तसेच कोणत्या राशींना सर्वात जास्त प्रभावित करेल? जाणून घ्या...

2026 चे पहिले सूर्यग्रहण अवघ्या काही दिवसांवर...(Surya Grahan 2026)

ज्योतिषशास्त्रानुसार हे सूर्यग्रहण फाल्गुन अमावस्येच्या दिवशी, 17 फेब्रुवारी 2026 रोजी होईल. 2026 चे पहिले सूर्यग्रहण भारतीय प्रमाण वेळेनुसार (IST) संध्याकाळी 5:31 वाजता सुरू होईल आणि 7:57 वाजता संपेल. जरी हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही आणि सुतक काळ म्हणून पाहिले जाणार नाही, मात्र ज्योतिषींच्या मते, त्याचा काही राशींच्या लोकांच्या जीवनावर खोलवर परिणाम होईल.

यंदा शनिच्या राशीत ग्रहण

ज्योतिषशास्त्रानुसार हे सूर्यग्रहण शनीच्या राशीत, कुंभ राशीत होत आहे, त्यामुळे ते अधिक त्रासदायक मानले जात आहे. शनिच्या राशीत म्हणजेच कुंभ राशीत हे सूर्यग्रहण सर्व 12 राशींच्या जीवनावर काही प्रमाणात परिणाम करेल. मात्र, ज्योतिषींच्या मते, तीन राशींना सर्वात जास्त त्रास होण्याची अपेक्षा आहे. ग्रहणाचा परिणाम साधारणपणे 15 दिवस टिकतो.

सिंह (Leo)

ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यग्रहण काळात सिंह राशीच्या लोकांनी घाईघाईने किंवा भावनिक निर्णय घेण्याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. मोठ्या व्यवसाय गुंतवणूकी, नवीन करार किंवा भागीदारीबाबत निर्णय काळजीपूर्वक विचारात घ्या, कारण यामुळे मोठे नुकसान होऊ शकते.

कर्क (Cancer)

ज्योतिषशास्त्रानुसार, या ग्रहणामुळे कर्क राशीच्या लोकांना मानसिक आणि शारीरिक नुकसान होऊ शकते. ताणतणाव आणि चिंता वाढेल. आजार होऊ शकतो. काळजीपूर्वक वाहन चालवा. ग्रहणानंतर किमान एक आठवडा कोणतेही मोठे निर्णय, गुंतवणूक टाळा.

कुंभ (Aquarius)

ज्योतिषशास्त्रानुसार, हे सूर्यग्रहण कुंभ राशीत होत आहे. ग्रहणाच्या वेळी बुध आणि शुक्र देखील कुंभ राशीत असतील. तुमचे मन विचारांनी आणि गोंधळाने भरलेले असेल. या परिस्थितीत कोणतेही मोठे निर्णय घेणे योग्य नाही. आर्थिक नुकसान देखील शक्य आहे. तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या.

हेही वाचा

Shani Asta 2026: पैसा..नोकरीचं टेन्शन संपलं! शनिचा अस्त होतोय, 3 राशी राजासारखं जगतील, मोठं उत्त्पन्न, संपत्तीचा मार्ग मोकळा..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)