Surya Grahan 2024:   ज्योतिषशास्त्रात सूर्य ग्रहणाला (Eclipse) फार महत्त्व आहे. ग्रहणाच्या प्रभावामुळे राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतात. फाल्गुन महिन्याच्या अमावस्येला 8 एप्रिल  2024 रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे. विशेष म्हणजे तब्बल 54 वर्षानतर पूर्ण सूर्यग्रहण लागणार आहे. वर्षातील पहिले सूर्यग्रहण लवकरच होणार आहे. हिंदूधर्मात चंद्र किंवा सूर्यग्रहण शुभ मानलं जात नाही. या कालावधीत कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर  8 एप्रिल रोजी असलेलं सूर्यग्रहण खूप खास आहे. या ग्रहणाचा लोकांच्या करिअर, आर्थिक स्थिती, आरोग्य, नातेसंबंध आदी गोष्टींवर परिणाम होऊ शकतो. राशीचक्रातल्या काही राशींसाठी हे  सूर्यग्रहण खूप शुभ आहे. या राशीच्या व्यक्तींना चांगल्या बातम्या समजतील, करिअरमध्ये प्रगती होईल तसेच धनलाभाचे योग देखील आहेत. 


8 एप्रिलचे सूर्यग्रहण हे भारतात दिसणार नसले तरी ज्योतिषशास्त्रानुसार तरी  काही राशीसांठी हे ग्रहण शुभ आणि अनिष्ठ फळ देणारे ठरणार आहे.  जाणून घ्या कोणत्या राशींवर ग्रहणाचा शुभ प्रभाव पडणार आहे.


मिथुन (Gemini)


मिथुन राशीच्या लोकांना सूर्यग्रहणाचा खूप फायदा होणार आहे. या काळात मिथुन राशीच्या लोकांना गुंतवणूक करण्यासाठी कालावधी अतिशय फलदायी असणार आहे. या गुंतवणुकीतून मोठा आर्थिक लाभ होणार आहे.. करिअर आणि बिझनेस या दोन्ही क्षेत्रात तुम्हाला यश मिळण्याची मोठी संधी आहे.


धनु (Sagittarius)


धनु राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण अतिशय खास असणार आहे. या काळात तुम्हाला करिअर आणि व्यवसायात खूप फायदा होणार आहे. हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ आहे. अविवाहित तरुण/तरुणांसाठी लग्नाचा योग जुळून येणार आहे.  जर तुम्ही भागीदारीत काम केले तर तुम्हाला अधिक नफा मिळेल.


मकर (Capricorn)


मकर राशीच्या लोकांसाठी येणारा काळ खूप शुभ राहील. या काळात तुमचे अडकलेले पैसे परत येऊ शकतात. वैवाहिक जीवनात संबंध सुधारतील. तुम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.


मीन (Pisces)


वर्षातील पहिले सूर्यग्रहण मीन राशीत होणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी सूर्यग्रहणाचा  दिवस  शुभ राहील. या काळात तुमचे संबंध सुधारतील. गैरसमज दूर होतील. नोकरीत बदल होऊ शकतो.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा:


 चैत्र नवरात्रीचे उपवास करणारे सर्व हिंदू खातात पाकिस्तानचे मीठ, नेमका प्रकार काय?