Surya Gochar 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य (Sun) ग्रहाला सर्व ग्रहांचा अधिपती ग्रह मानतात. हा ग्रह आत्मबळ, आरोग्य, प्रतिष्ठा आणि नेतृत्वक्षमतेचं प्रतिनिधीत्व करतो. त्यानुसार, उद्या म्हणजेच 11 जानेवारी 2026 रोजी रविवारच्या दिवशी सकाळी 8 वाजून 42 मिनिटांनी सूर्य उत्तराषाढ नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या दरम्यान सूर्य धनु राशीत स्थित असतील. विशेष म्हणजे या राशीचा नक्षत्र स्वामी सूर्य ग्रह आहे. त्यामुळे सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने काही राशींचे दिवस पालटणार आहे. या लकी राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. उत्तराषाढ नक्षत्रात प्रवेश केल्याने तुमच्या आत्मविश्वासात चांगला बदल दिसून येईल. नशिबाची साथ तुमच्याबरोबर असेल. तसेच, या काळात तुमचे प्रवासाला जाण्याचे योग जुळून येणार आहेत. तुमच्या घरातील वातावरण चांगलं असेल. धनसंपत्तीच्या बाबतीत तुमची स्थिती चांगली असेल. तसेच, पैशांची गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला असेल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. उत्तराषाढ नक्षत्रात प्रवेश केल्याने तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. तसेच, तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. नवीन प्रोजेक्ट्स तुमच्या हाती लागू शकतात. तसेच, देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आर्थिक संपत्तीत भरभराट झालेली दिसेल. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल.
धनु रास (Saggitarius Horoscope)
या राशीत सूर्य ग्रह आधीपासूनच विराजमान आहे. उत्तराषाढ नक्षत्रात प्रवेश केल्याने तुमचं भाग्य उजळणार आहे. तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, तुम्ही गुंतवून ठेवलेल्या पैशांतून तुम्हाला चांगला रिटर्न मिळेल. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे.
मकर रास (Capricorn Horoscope)
उत्तराषाढ नक्षत्रात सूर्याचा प्रभाव मकर राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरेल. या काळात तुमच्या करिअरमध्ये चांगली स्थिरता दिसेल. नोकरदार वर्गातील लोकांना चांगलं प्रमोशन मिळण्याची संधी मिळेल. सरकारी योजनांचा तुम्ही लाभ घ्याल. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
उत्तराषाढ नक्षत्रात सूर्याचं संक्रमण कुंभ राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरेल. अचानक धनलाभाचे योग जुळून येणार आहेत. तसेच, समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. नवीन लोकांशी भेटीगाठी होतील. तुमच्या नात्यातील गैरसमज दूर होतील.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)